शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लसीसाठी मोठी सुई; वेस्टेजमुळे पळता भुई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:15 IST

एडी सुईच्या तुटवड्यामुळे २ सीसी सिरिंजचा वापर अमरावती : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात ...

एडी सुईच्या तुटवड्यामुळे २ सीसी सिरिंजचा वापर

अमरावती : कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. बालकांच्या लसीकरणासाठी २ सीसी सिरिंज वापरण्यात येत असल्याने लसीचे वेस्टेज वाढत असल्याचे दिसून येत आहे. एडी सुईचा तुटवडा जाणवत असल्याने आरोग्य विभागासमोर नवीन अडचणी निर्माण होत आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना लसीकरणाला गती देण्यात आली आहे. राज्यस्तरावरून लसींचा मुबलक पुरवठा होत असल्याने लसीकरण झालेल्यांची संख्या वाढली आहे. परंतु, हे लसीकरण करण्यासाठी एडी सुईचा वापर केला जात असे .ही सुई केंद्र शासनाने दिली आहे. त्याचा हमखास तुटवडा जाणवत आहे. एडी सुईचा तुटवडा असल्याने स्थानिक पातळीवर २ सीसी सुईची खरेदीची वेळही आरोग्य विभागावर वारंवार येत आहे.

बॉक्स

काय आहे एडी, २ सीसी सिरिंज?

एडी सिरिंज ऑटो डिसेबल आहे. ०.५ मि.मि.ची ही सुई एकदा वापरली की पुन्हा वापरता येत नाही. ही सुई आपोआपच लॉक होते. या सुईतून लस वेस्टेज होत नाही, तर २ सीसी ही सुई नियमित इंजेक्शनची असते. त्यामुळे डोस वाया जातो. ती डिस्पोजेबल आहे.

बॉक्स

दररोज १० ते १५ हजार सुयांची गरज

जिल्ह्यात दररोज सरासरी किमान ५ ते १० हजारांचे दरम्यान लसीकरण होते. त्यामुळे रोज किमान १० ते १५ हजार सुयांची आवश्यकता भासते. अशा परिस्थितीत शासनाकडून त्या लवकरात लवकर आरोग्य विभागाकडे आणि तेथून जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेकडे त्या सु्यांची पुरवठा होणे आवश्यक आहे.

बॉक्स

वेस्टेज वाढले !

जिल्ह्यात रोज होणाऱ्या लसीकरणात या प्रकारच्या सिरिंजमुळे पाच टक्के लस ही वाया जात आहे. एडी सुईचा तुटवडा असल्याने स्थानिक पातळीवर वेळप्रसंगी एडी सुई खरेदी लागण्याची वेळही आरोग्य विभागावर येते. त्यामुळे या एडी सुईचा पुरेसा पुरवठा होणे आवश्यक आहे.

बॉक्स

स्थानिक बाजारातून खरेदीच्या सूचना

केंद्र शासनाकडून पुरवठा कमी होत असल्याने एडी सुयांचा तुटवडा आहे. हा तुटवडा भरून काढण्यासाठी स्थानिक पातळीवर खरेदीचे आदेश आम्हाला दिले आहेत. त्यानुसार या सुया खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

बॉक्स

बाजारपेठेतही तुडवडा

कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सिरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. अशातच आरोग्य यंत्रणेला आवश्यकता भासल्यास एडी सुई खरेदी करण्याचे सांगण्यात आले असले तरी माहितीनुसार बाजारपेठेतही या सुयांचा तुटवडा असल्याची माहिती आहे.

१०