शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

द्रुतगती महामार्गासाठी जमीन देणार नाही

By admin | Updated: August 22, 2016 00:07 IST

नागपूर-मुंबई द्रुतगती शिघ्र संचार महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणास शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या...

शेतकरी ठाम : नांदगावच्या शेतकरी सभेत एकमुखी निर्णयनांदगाव खंडेश्वर : नागपूर-मुंबई द्रुतगती शिघ्र संचार महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहणास शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या सभेत विरोध दर्शविणारा एकमुखी निर्णय घेण्यात आला. या शेतकरी सभेला बहुतांश राजकीय पक्षाचे नेते मंडळीची प्रामुख्याने उपस्थिती होती. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणास संमती न देण्याचा ठरावही सभेत घेण्यात आला.सन २०१३ च्या भूमी अधिग्रहण कायद्याने शेतकऱ्यास जमीन अधिग्रहणाबाबत संमतीचा अधिकार दिला असून ७० टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पासाठी संमतीची आवश्यकता असते. पण शेतकऱ्यांना लोभाच्या योजनेचे गाजर दाखवून त्यांचा कायदेशीर अधिकाराला बगल देण्यात येत आहे, असा सूरही काही वक्त्यांनी भाषणातून व्यक्त केला. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, तुकाराम भस्मे, प्रमोद तऱ्हेकर, पांडुरंग ढोले, अभिजित ढेपे, प्रकाश मारोटकर, वाशिमचे नरेंद्र राऊत, शेतकरी संघटनेचे गजानन अहमदाबादकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशवराव तांदुळरकर व रघुपती गावंडे होते. कार्यक्रमाचे संचालन सुनील मेटकर व आभार प्रदर्शन पंडितराव ढोके यांनी केले.नागपूर-मुंबई शिघ्र संचार द्रुतगती महामार्ग जमीन अधिग्रहण विरोधी संघर्ष समिती शिवणी (रसुलापूर) च्यावतीने या शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शेतकरी सभेला नितीन टाले, विजय गावंडे, सरपंच मधुकर कोठाळे, गजानन खोडे, भानुदास मंदुरकर, उद्धव वारवे, विनोद जगताप, मिलिंद कडू, विनोद जोशी, नारायण भगवे, सुरेंद्र दांडगे, संजय गावंडे, हरिदास लिचडे, अमोल राजकुले, रवि आगळे तसेच नागपूर-मुंबई शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग जमीन अधिग्रहण विरोधी संघर्ष समिती शिवाणी रसुलापूरची मंडळी व परिसरातील शेतकरी मंडळी प्रामुख्याने उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)लोभाचे गाजर दाखवून जमिनी घेण्याचा प्रयत्ननागपूर-मुंबई या द्रुतगती शिघ्रसंचार महामार्गासाठी जमिनी न देण्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून त्यांच्याकडून जमिनी काढून घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. शेतकऱ्यांच्या कायदेशीर अधिकाराला बगल देण्याचा प्रकार केला जात आहे. त्यामुळे या जमीन अधिग्रहणाविरुद्ध तालुक्यातील शेतकरी एकवटले आहेत. कोणत्याही परिस्थितीत जमिनी या महामार्गासाठी देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे.