शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

अवैध भूखंड विक्रीचा सपाटा

By admin | Updated: August 17, 2015 00:12 IST

अधिकृत अधिन्यास पाडण्यासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध भूखंड पाडून अचलपूर-परतवाड्यात विक्री करण्याचा सपाटा सुरु आहे.

अचलपूर-परतवाडा शहर : नियम धाब्यावर, अधिकाऱ्यांचे हेतुपुरस्सर दुर्लक्षसुनील देशपांडे अचलपूरअधिकृत अधिन्यास पाडण्यासंबंधीचे सर्व नियम धाब्यावर बसवून अवैध भूखंड पाडून अचलपूर-परतवाड्यात विक्री करण्याचा सपाटा सुरु आहे. यात संबंधित अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याने तेही याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही अधिन्यासामध्ये रस्ते व इतर सुविधा न करून देताही त्यांना प्लॉट विक्री करण्याची परवानगी मिळाली आहे. यामध्ये प्लॉटकिंग व दलाल अल्प कालावधीत चांगलेच गब्बर झाले असले तरी यामध्ये भूखंडधारकांची पिळवणूक होत आहे.अचलपूर-परतवाड्यात कित्येक भागांत तथा शासकीय मालकीची जागा रिकामी पडलेली असून त्यावरही अतिक्रमण करून घरे बांधण्यात येत आहेत. त्यामुळे लाखो स्क्वेअर फूट जागेवर अतिक्रमित घरे बांधण्यात आली आहेत. जुळ्या शहरालगत असलेल्या शेतीवर महसूल विभाग, नगररचना विभाग यासह कुठल्याही खात्याची परवानगी न घेता खासगी अभियंत्यामार्फत मोजमाप करण्यात येऊन आपल्याला पाहिजे तसे भूखंड पाडून त्याची विक्री करण्यात येत आहे. ही विक्री ६०० ते ७०० रुपये स्क्वेअर फूट दराने करण्यात येत असून अवघ्या १०० रुपयांच्या शासकीय मुद्रांकावर त्याची विक्री सुरु आहे. यापूर्वी कित्येक प्लॉट्सची तशीच विक्री झाली असल्याने शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.प्रतिबंधित क्षेत्रातही भूखंडपुरातन असलेले परकोट हे पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून यावर त्यांची देखरेख आहे. सदर विभागाच्या नियमानुसार परकोटपासून ३०० मीटरच्या आत कुठल्याही प्रकारचे पक्के बांधकाम करता येत नाही. यासंबंधीचे परिपत्रक पुरातत्त्व खात्याने नगरपालिकेलाही दिले आहे. मात्र परकोटपासून १०० मीटरच्या आत शेतीवर भूखंड पाडण्यात येऊन त्याची १०० रुपयांच्या स्टँपवर धडाक्यात विक्री सुरु झाली आहे. काही भूखंडावर घरे बांधकाम करण्यास सुरुवात झाली आहे. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यातील काही अधिकाऱ्यांना नगरसेवकांचे अभवय असल्याने नगर परिषदेचे अधिकारी कारवाई करायला तयार नाहीत. काही ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांनी चांगलाच मलिदा लाटल्याने कारवाईची हिंमत दाखवीत नाही.नगर परिषदेचे संबंधित अधिकारी बऱ्यापैकी दादागिरी व गुंडागिरी करणारे व काही लोकप्रतिनिधी यांचा त्रिवेणी संगम असल्याने त्यांच्याविरुद्ध कुणीही आवाज काढण्याची हिंमत दाखवीत नाही. वेळप्रसंगी पोलीसही त्यात सामील असल्याने वाचा फोडणाऱ्यावरच कारवाई होत असते. तक्रार करणाऱ्या मो. अजहर ह्यांना एक वर्षापूर्वी बेदम मारहाण करण्यात येऊन त्यांचा पायही हल्लेखोरांनी मोडला होता. पण, पोलिसांनी मो. अझर यांनी मारहाण झाल्यावरही त्यांनाच पध्दतशिरपणे पोलीस कारवाईत गोवले होते. हे बांधकाम पाडावे यासाठी सेवानिवृत्त शिक्षिका अफरोजबानो यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. परंतु अजूनही ते अवैध बांधकाम जैसे थेच आहे.संबंधित अधिकाऱ्यांचे व प्लॉटकिंगंचे साटेलोटे असते. त्यात रस्ते, नाल्या, पथदिवे, मैदानाची सोय नसताना त्यांना परवानगी दिली जाते. ज्या अधिन्यासात असा प्रकार झाला आहे त्यांची चौकशी करण्यात यावी, अन्यथा युवा स्वाभिमान संघटनेतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा गुरुवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिलेला आहे.- उपेन बछेल संपर्क प्रमुख, अचलपूर विधानसभा अवैध अधिन्यास पाडले गेले असल्याची माहिती आम्हालाही मिळाली आहे. त्याची चौकशी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला दिले आहेत. परकोट शेजारी भूखंडावर घर बांधकामाला परवानगी मिळणार नाही. तसेच ज्यांनी घरे बांधली आहेत त्यांना मनपा कुठलेही नाहरकत प्रमाणपत्र देणार नाही.- धनंजय जावळीकर, मुख्याधिकारी, नप.अशीच वसुली विठ्ठलवाडीतअचलपूर येथील तहसील मार्गावरील भूखंड पाडून विक्री करण्यात आली होती. तेथे मोठमोठ्या इमारती उभारण्यात आल्यात. काही वर्ष येथे नगरपरिषदेने कुठल्याच सुविधा दिल्या नाहीत. पण, काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचे नळ दिल्याची माहिती आहे. आता हे अधिन्यास अधिकृत करण्याच्या हालचाली पालिकेच्या काही पदाधिकाऱ्यांनी सुुरु केल्या आहेत.प्लॉटकिंगच्या थापाप्लॉटकिंग व दलाल भूखंड विक्रीकरिता आपल्या बोलीवचनात ग्राहकाला हेरून त्याला प्लॉटच्या नोंदणीपासून ते पी.आर. कार्ड (मालकी प्रमाणपत्र) देण्यापर्यंत अश्वासन देतात व एकदाचा भूखंड विकला गेला की तू कोण अन् मी कोण, अशी भूमिका घेतात. यात आपली फसवणूक झाल्याचे प्लॉटधारकांचे उशिरा लक्षात येते.