शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

- आणि अमरावतीत लँड झाली 'एअर अ‍ॅम्ब्युलन्स'

By admin | Updated: October 20, 2016 00:12 IST

जीवघेणी स्पर्धा आणि स्वार्थाच्या या दुनियेत सामाजिक दायित्व जपणारे व्यक्ती आजही आहेत.

ऋण मातीचे : विलास कथे यांची सहृदयताअमरावती : जीवघेणी स्पर्धा आणि स्वार्थाच्या या दुनियेत सामाजिक दायित्व जपणारे व्यक्ती आजही आहेत. असाच अनुभव अमरावतीने नुकताच घेतला. अमरावती जिल्ह्याचे मूळ रहिवासी असलेले आणि बॉलीवुडमध्ये प्रभाव असलेले विलास कथे यांनी लागलीच ‘एअर अ‍ॅम्बुलन्स’ सेवा उपलब्ध करून दिल्याने येथील ठाकरसी सोमय्या (८५) या वयोवृद्ध व्यक्तीला काही तासांतच उपचारार्थ मुंबईला हलविता आले. यासाठी कथे यांनी कुठलाही व्यावसायिक लाभ घेतला नाही. विलास कथे हे मुळचे परतवाडा येथील रहिवासी आहेत. मुंबईत ते व्यावसायिक तत्त्वावर हेलिकॉप्टर सेवा पुरवितात. स्थानिक रहिवासी ठाकरसी सोमय्या (८५) हे डॉ. रोहित चोरडिया यांच्या रूग्णालयात दाखल होते. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ठाकरसी यांच्या शरीरातील अवयव निकामी होत असल्याचे डॉ. चोरडिया यांच्या निदर्शनास आले. त्यांच्यावर मुंबईत तीन ते चार तासांत पुढील उपचार होणे आवश्यक होते. रूग्णाचे नातेवाईक अमित सोमय्या यांनी महापौर चरणजित कौर नंदा यांच्याशी दुपारी साडेबारा वाजता संपर्क केला. महापौरांनी विलास कथे यांना अडचण सांगितली. मातीचे ऋण फेडण्याची संधी म्हणून व्यावसायिक लाभाविना कथे यांनी ‘एअरबस अ‍ॅम्बुलन्स’ उपलब्ध करून दिली. क्लिष्ट विमानतळ नियमांची आवश्यक ती पूर्तता करून दोन तासांत बेलोरा विमानतळावर एअर अ‍ॅम्बुलन्स पोहोचली. मुंबईत केवळ दोनच एअर अ‍ॅम्ब्युलन्स आहेत, हे विशेष. साडेबारा वाजता एअरबस अ‍ॅम्बुलन्ससाठी फोन आला. दुपारी सव्वा तीन वाजता एअर अ‍ॅम्बुलन्सने बेलोरा विमानतळ गाठले. पुढल्या सव्वा तासात रुग्णाला मुंबईत पोहोचविले. मातीचे ऋण फेडण्याची संधी होती. इवलासा प्रयत्न केला. -विलास कथे, मुंबईठाकरसी सोमय्या यांच्यावर उपचार सुरु असताना अचानक ते कोमात गेले. मंगळवारी दुपारपर्यंत सगळे प्रयत्न करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय झाला व अंमलात आला. -रोहित चोरडियाहृदयरोग तज्ज्ञ, अमरावतीरुग्णाला मुंबईत हलविण्यासाठी महापौर आणि विलास कथे यांची अमुल्य मदत झाली. त्यांनी याकामी त्यांच्या व्यावसायिक लाभावर पाणी सोडले. अमरावतीत डॉ.चोरडिया आणि एअर अ‍ॅम्ब्युलन्समध्ये डॉ.एजाझ खान यांनी मोठीच मदत केली. - अमित सोमय्या, रुग्णाचे नातेवाईक