शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

आंध्र प्रदेशातील ‘लक्ष्मी’ अमरावतीत

By admin | Updated: November 2, 2015 00:33 IST

हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. घराला रंगरंगोटी, फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी,

कुटुंबीयांसह दाखल : दीपोत्सव ‘कॅश’ करणारअमरावती : हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्व आहे. घराला रंगरंगोटी, फराळ, फटाके, आकाशकंदील, रांगोळी, आकर्षक दिवे-पणत्या लावून हा सण साजरा केला जातोे. दिवाळीत लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस असून, या दिवशी घरात लक्ष्मीचा वास असावा म्हणून झाडू-झाडणीची पूजा केली जाते. यंदा आंध्र प्रदेशातील काही कुटुंबीय अमरावतीत दाखल झाले आहेत. दीपोत्सव ‘कॅश’ करण्यासाठी ‘लक्ष्मी’ची विक्री करताना दिसून येत आहेत.दिवाळी हा आनंद आणि उत्सवाची पर्वणी. फटाकेल नवीन कपडे, आणि गोडधोड फराळ यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो. दिवाळीची चाहूल लागताच घराच्या साफसफाई, रंगरंगोटीला सुरुवात होते. दीपावलीत प्रत्येक दिवस महत्वाचे वेगळे असून, लक्ष्मीपूजनाला झाडणीची पूजा करण्याची परंपरा आहे. केरसूणी (झाडणी) ही घर स्वच्छ ठेवणारी, घरातील लक्ष्मी म्हणून मान आहे. महाराष्ट्रातील बारा बलुतेदार मागे पडल्याने आता पारंपरिक व्यवसाय लोप पावू लागले आहेत. पूर्वी विशेष करुन मातंग समाजाचे लोक केरसूणी तयात करीत होते. मात्र झाडणी तयार करण्यासाठी सिंदीची झाडे मिळत नसल्याने पारंपरिक व्यवसायावर अवकळा आली आहे. परिणामी आंध्रप्रदेशातील सुमारे १२ ते १५ कुटुंब लाखो झाडण्या घेऊन शहरात दाखल झाले आहे. खजुराचा पानापासून या झाडण्या तयार केल्या जातात. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारांत तयार करण्यात येणाऱ्या या झाडण्यांची किंमत१५ ते २० रुपये इतकी आहे. एरवी ही मंडळी शेतमजुरी, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मात्र दिवाळीच्या मोसमात महाराष्ट्रात चांगला व्यवसाय असल्याने ते झाडणी बनविण्याचा आपला पांरपरिक व्यवसाय करतात. राज्यातील प्रमुख शहरात आंध्रप्रदेशातील झाडणी विक्री करणारे दाखल झाले आहेत. दिवाळीचा उत्सव कॅश केल्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतात हा दरवर्षीचा शिरस्ता आहे. (प्रतिनिधी)