शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

ग्राहकांना अळ्या, अधिकाऱ्यांना काजू

By admin | Updated: September 28, 2016 00:07 IST

अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांच्या दिमतीला काजूची प्लेट नि पैसे मोजणाऱ्या ग्राहकांच्या कचोरीत अळ्या, अशी किळसवाणी व्यावसायिक रीत रघुवीरने अवलंबिली आहे.

...येपैसा बोलता है : 'रघुवीर'कडून एफडीएची खातिरदारी, निष्पक्ष कारवाई होणार कशी ?अमरावती : अन्न व औषधी प्रशासन अधिकाऱ्यांच्या दिमतीला काजूची प्लेट नि पैसे मोजणाऱ्या ग्राहकांच्या कचोरीत अळ्या, अशी किळसवाणी व्यावसायिक रीत रघुवीरने अवलंबिली आहे. 'लोकमत'ने कचोरीतील अळीचे धक्कादायक वास्तव लोकदरबारात मांडल्यानंतर अन्न प्रशासन विभागाचे अधिकारी 'रघुवीर'मध्ये तपासणीसाठी धडकले. रघुवीरच्या संचालकांनी त्यांच्यासमोर काजूची प्लेट ठेवली. कारवाई करायला गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर काजूची प्लेट ठेवण्याची हिम्मत होतेच कशी? अधिकारी का सहन करतात ही लाचारी? लोकांच्या प्लेटमधील खाद्यान्नात अळी असताना, स्वत:समोर ठेवलेली काजूची प्लेट कशी चालली अधिकाऱ्यांना? एफडीएचे हेच काय कर्तव्य?कचोरीत आढळलेली अळी ही रघुवीरच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असतानाही एफडीएकडून रघुवीरला पाठीशी घालण्याचाच प्रयत्न अधिक झाला आहे. ‘रघुवीर’वर एफडीएची मेहेरनजर का, या अमरावतीकरांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर तर या छायाचित्रातून मिळत नाही ना? ज्या ‘रघुवीर’वर डोळे मिटून विश्वास ठेवला जातो, त्याच्या खाद्यपदार्थ निर्मितीच्या ठिकाणी अस्वच्छता, हॅन्डग्लोव्हज न वापरणे, खाद्यान्न निर्मिणाऱ्या कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणी न करणे अनेक गंभीर बाबी आढळून आल्यात. मुळात या मुद्यांचा अन्न व औषधी प्रशासनाने स्वत:हून शोध घ्यायला हवा होता. असल्या बाबी घडल्यावर त्यासाठी नोटीशी बजावण्याऐवजी नागरिकांच्या आरोग्याला धोकाच पोहोचू नये, याअनुषंगाने कर्तव्य बजावणे, हे एफडीएचे कर्तव्य आहे. परंतु स्टाफ नसल्याचे रडगाणे गाऊन हा विभाग बड्या धेंडांना नेहमीच पाठीशी घालत आला आहे. रघुवीर प्रतिष्ठानचे तीन विक्री केंद्र आणि एक निर्मिती केंद्र आहे. सर्वच केंद्रांतील नमुने अधिकाऱ्यांनी घेतलेले नाहीत. खरे तर एकाचवेळी सर्वच ठिकाणचे नमुने घेणे कारवाईच्या दृष्टीने आवश्यक होते. परंतु अधिकाऱ्यांनी या बाबतीतही रघुवीरला छुपे बळ दिले. पालकमंत्र्यांची बेदअदबी!रघुवीरचा मुद्दा 'लोकमत'ने लोकदरबारात प्रभावीपणे मांडल्यानंतर पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी घेतलेल्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत निरीक्षक दर्जाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी त्यांना रवाना करून प्रमुखांना- जयंत वाणे यांना बोलविण्यास सांगितले. 'लोकमत'ने हा किस्सा प्रकाशित केल्यावर असे काहीच घडले नसल्याचा बनाव वाणे यांनी सतत केला. पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून या बेअदबीबाबत त्यांना विचारणा झाल्यावर मात्र वाणे यांनी बैठकीला औषधी निरीक्षक उमेश घरोटे हे गेले होते हे मान्य केले. रघुवीरच्या बचावार्थ एफडीएची सारीच फळी कशी जुंपली आहे, याचे हे उदाहरण होय. (प्रतिनिधी)