शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन हजार लीटरने घटली दुधाची आवक

By admin | Updated: January 17, 2017 00:01 IST

दुग्ध व्यावसायिकांनी शासकीय दूध विकास केंद्राकडे पाठ फिरविल्यामुळे जानेवारी महिन्यात शहरात शासकीय दुधाची आवक घटल्याचे चित्र आहे.

शासकीय संकलन केंद्राकडे उत्पादकांची पाठसंदीप मानकर अमरावतीदुग्ध व्यावसायिकांनी शासकीय दूध विकास केंद्राकडे पाठ फिरविल्यामुळे जानेवारी महिन्यात शहरात शासकीय दुधाची आवक घटल्याचे चित्र आहे. पूर्वी १२ ते १५ हजार लीटर दुधाची आवक होती. सद्यस्थितीत ती ७ ते ९ हजार लीटरवर आली आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून दूध उत्पादन घटल्याने अनेक नोंदणीकृत दुग्ध संकलन संस्था अवसायनात निघाल्या असून काही संस्था बंद पडल्या आहेत. सद्यस्थितीत सात ते नऊ हजार लीटर दुधाची आवक या शासकीय दुग्धविकास केंद्रांमध्ये सुरू आहे. ५७ सहकारी संस्थांमधून दूध संकलन होत आहे. दुग्ध उत्पादन करणाऱ्या संस्थांना शासकीय दुग्ध विकास केंद्राद्वारे वाजवी दर मिळत नसल्याने हे दूध उत्पादक खासगी दूध डेअरींना दुधाची विक्री करतात. खासगी दूध डेअरींमध्ये दुधाला अधिक दर मिळत असल्याने दूध उत्पादकांचा कल त्याकडे वाढतो आहे. वास्तविक डिसेंबर महिन्यात शहरात दुधाची आवक वाढली होती. परंतु वातावरण बदलामुळे जानेवारीत दुधाची आवक घटल्याची माहिती शासकीय यंत्रणेने दिली. शासकीय दूध संकलन केंद्रात दररोज २४०० ते २५०० लिटर ‘टोन्ड मिल्क’ तयार होते. एकूण ५२६ प्राथमिक नोंदणीकृत दूध उत्पादक संस्था असून त्यापैकी ४४९ संस्था अवसायनात निघाल्या असून तूर्तास ५७ संस्था सुुस्थितीत सुरू आहेत, तर १७ ते १९ संस्था दूध संकलनाअभावी पूर्णपणे बंद पडल्या आहेत. अमरावती येथील शासकीय दूध संकलन केंद्रात यवतमाळ येथून दररोज दुधाचा टँकर येतो. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही दुधाचे संकलन केले जाते. या संकलित दुधावर प्रक्रिया करून शासनाच्या ‘आरे ब्रँड’ची पाकिटे तयार केली जातात व व्यावसायिकांना विक्रीसाठी वितरित केली जातात. दूध डेअरींमधून या दुधाची नागरिकांना ४० ते ५० रूपये प्रती लीटरनुसार विक्री केली जाते. नोंदणीकृत दूध उत्पादक सहकारी संस्थांद्वारे शासकीय संकलन केंद्राला दुधाची विक्री केली जात असली तरी त्यांना अत्यल्प दर मिळतो. ३.०५ फॅ ट व ८.५ एसएनएफ (सॉलिड नॉट फॅट) साठी २४.५० पैसे प्रतीलीटर, तर ६.० फॅट व ९.० एसएनएफच्या प्रमाणासाठी ३१.५० पैसे इतका दर दिला जातो. हा दर बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने तो परवडत नसल्याचे दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. परिणामी प्रतीलिटर ५ ते १० रूपये अधिक दराने ्नखासगी दूध डेअरींना दूध देण्याकडे कल वाढला आहे, ही स्थिती फारशी समाधानकारक नाही. ५७ नोंदणीकृत प्राथमिक दुग्ध उत्पादन संस्था सुरू आहेत. त्यापैकी ५७ संस्थाच संघाला दूध पुरवितात. तीन ते चार वर्षांच्या तुलनेत तीन हजार लीटरनी दुधाची आवक घटली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. - एस.बी.जांभुळे, दुग्धशाळा व्यवस्थापक, शासकीय दूध योजना, अमरावती