शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

वादळी पावसामुळे लाखोंची हानी

By admin | Updated: June 12, 2014 23:39 IST

परिसरात बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे लाखोंची हानी झाली. वादळाच्या तीव्रतेमुळे अनेक घरांवरची छत, टीन आणि कवेलू उडाले. विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडली.

 पुसला : परिसरात बुधवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे लाखोंची हानी झाली. वादळाच्या तीव्रतेमुळे अनेक घरांवरची छत, टीन आणि कवेलू उडाले. विद्युत खांब आणि झाडे उन्मळून पडली. यामध्ये ग्रामस्थांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कित्येक कुटुंब बेघर झाले. परिसरातील वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.बुधवारी (११ जून) रात्री ८ वाजताच्या दरम्यान अचानक वादळी पाऊस झाला. वादळाची तीव्रता अधिक असल्याने पुसला गावातील झाडे, विद्युत खांब उन्मळून पडले तर विद्युत तारा तुटल्या. टेलिफोनचे खांबही पडले. यामुळे विद्युत पुरवठा, दूरध्वनी सेवा रात्रभर खंडित होती. पुसला येथील अनेकांच्या घराचे छत टीना आणि कवेलू उडाले. प्रभात हायस्कूलच्या वर्गखोल्यांचे टीन दूरवर उडाले. वृक्ष उन्मळून पडल्याने अनेक घरांची मोडतोड झाली. डॉ.बाबासहोब आंबेडकर सभागृहाची सुरक्षा भिंत आणि स्लॅबवर झाड कोसळल्याने सभागृहाचे मोठे नुकसान झाले. विद्युत खांब वाकल्याने तारा तुटल्या. यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पुसलावासीयांना अख्खी रात्र काळोखात काढावी लागली. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागला. पशुही सैरभैर झाले होते. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण तहसीलदार राम लंके यांनी तलाठ्यांमार्फत केले असून तसा अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्तांना शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.