शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इर्विन रुग्णालयात रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:39 IST

दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.

ठळक मुद्देगरजूंची रक्तासाठी धावाधाव : शिबिर आयोजनाची नितांत आवश्यकता

इंदल चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिवाळीच्या सुट्यांमुळे महाविद्यालयांमध्ये रक्तदान शिबिर होऊ शकले नाहीत. त्यामुळे जिल्हाभरात रक्तपुरवठा करणाऱ्या इर्विन रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे.इर्विन रुग्णालयातील रक्तपेढीतून जिल्हा स्त्री रुग्णालय, सुपर स्पेशालिटी व जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो तसेच जिल्ह्यातील आठ ब्लड स्टोअरेजमध्येही रक्तपुरवठा केला जातो. यासाठी जिल्ह्यातील विविध भागातील महाविद्यालये, सामाजिक संघटनांद्वारे आयोजित रक्तदान शिबिरांमार्फत रक्त संकलन केले जातात.सध्या दिवाळीच्या सुट्या आल्याने सामाजिक संघटना इतर कामात व्यस्त, तर विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने ते बाहेरगावी गेल्यामुळे शिबिरे झालेली नाहीत. त्यामुळे इर्विन रक्तपेढीत रक्त संकलन प्रक्रिया थांबल्यामुळे विविध ग्रुपच्या रक्ताची आवश्यकता भासत आहे. परिणामी सिकलसेल, हिमोफिलिया, थॅलेसिमियाचे रुग्णांना रक्तपुरवठा करणे कठीण जात आहे तसेच रुग्णांना रक्त मिळवून देण्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची इतरत्र धावाधाव सुरू आहे.दिवाळी भेट म्हणून रक्तदान करण्याची संकल्पना राबविल्यास ती अमरावतीकरांसाठी सुंदर उपक्रम ठरू शकतो. याबाबत विद्यार्थी, युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक झाले आहे. हल्ली रक्तदान शिबिरे घेण्याची नितांत गरज असल्याचे इर्विन रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर म्हणाले.आठ ब्लड स्टोअरेजमध्ये रक्तपुरवठाजिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये, दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांत उपचाराकरिता येणाºया रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासल्यास ते जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ शकत नाहीत तसेच दुर्गम भागात वेळीच रक्तपुरवठा व्हावा, या उद्देशाने इर्विनच्या रक्तपेढीमार्फत जिल्ह्यातील धारणी, चिखलदरा, चुरणी, मोर्शी, वरूड, दर्यापूर, अचलपूर व डफरीन रुग्णालयात रक्तपुरवठा केला जातो.एबी, बी पॉझिटिव्ह रक्त मिळणे दुरापास्तसध्या रक्तपेढीत प्रत्येक ग्रुपमध्ये सात ते आठ बॅग रक्त जमा असून, एबी आणि बी पॉझिटिव्ही रक्त उपलब्ध नाही. त्यामुळे अशा ग्रुपच्या रुग्णांना रक्त मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहे.दिवाळीची भेट देण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत आहे, त्याचप्रमाणे रुग्णांच्या वाढच्या गरजेनुसार नागरिकांनी रक्तदान शिबिर घेऊन जीवनज्योती योजनेप्रमाणे गरजू रुग्णांना दिवाळी भेट द्यायला हवी.- श्यामसुंदर निकम,जिल्हा शल्यचिकित्सक