शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कुत्तरमारेंवर अ‍ॅट्रॉसिटी महापालिकेत कामबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 23:14 IST

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. याबाबत मागण्यांचे निवेदन आयुक्त संजय निपाणे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देगुन्हे मागे घेण्याची मागणी : महापालिका कर्मचारी, कामगार संघ आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर गाडगेनगर ठाण्यात नोंदविण्यात आलेला अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी महापालिका कर्मचारी, कामगार संघाद्वारा सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आले. आयुक्तांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. याबाबत मागण्यांचे निवेदन आयुक्त संजय निपाणे यांना देण्यात आले.महापालिकेच्या अतिक्रमण पथकाद्वारा कॅम्प परिसरात दैनंदिन कार्यवाही सुरू असताना जिल्हा परिषदेसमोरील गोपाल चव्हाण या इसमाची अतिक्रमित पानटपरी उचलत असताना त्याने अर्वाच्च शिविगाळ करून अतिक्रमण पथक प्रमुख गणेश कुत्तरमारे विरोधात खोटी तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी देखील वस्तुस्थिती जाणून न घेता अ‍ॅट्रॉसीटी सारख्या गंभीर गुन्ह्याची नोंद केली. हे कामकाजाचे दृष्टीने अंत्य गंभीर बाब आहे. कर्मचारी त्यांचे दैंनदिन कामकाजासाठी फिल्डवर असताना त्यांचे मनोधैर्य खच्ची होऊन याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आली.या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने यामध्ये मध्यस्ती करून कर्मचाºयांना यथायोग्य सरंक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. गणेश कुत्तरमारे यांच्यावर दाखल गुन्हे त्वरित मागे घ्यावे, यासाठी वरिष्ठ अधिकाºयांशी प्रशासकीय स्तरावर चर्चा करून वस्तुस्थिती जाणून कार्यवाही करावी, अन्यथा कर्मचाºयांना प्रशासकीय कामकाज करणे कठीण होईल. या घटनेमुळे कर्मचारी हादरलेले असून, यातून कर्मचाºयांना सावरण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, असे संघटनेद्वारे आयुक्तांना निवेदनात म्हटले आहे. यावेळी अध्यक्ष रमेश पांडे, कार्याध्यक्ष मानविराज दंदे, सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल आदी पदाधिकारी उपस्थित होते.पोलीस आयुक्तांना देणार निवेदनअतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे यांच्यावर दाखल अ‍ॅट्रॉसिटी बाबतची सत्यता पडताळणी करण्यात येऊन गुन्हे मागे घेण्यात यावे, यासाठी पोलीस आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस प्र्रल्हाद कोतवाल यांनी दिली. दरम्यान सोमवारी सायंकाळी महापौर संजय नरवणे व आयुक्त संजय निपाणे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती संघटनेद्वारा कामबंद आंदोलन मागे घेण्यात आल्याचे कोतवाल यांनी सांगितले.