लोकमत न्यूज नेटवर्ककुऱ्हा (अमरावती) : येथील शेतकरी सचिन देशमुख यांना नाशिक येथे ‘डाळिंब मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील निवडक २० सत्कारमूर्तींमध्ये त्यांचा समावेश होता.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ व नाशिक जिल्हा डाळिंब उत्पादक संघांच्यावतीने सेंद्रिय शेती विषयावर नाशिक येथे परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातून ३०० सेंद्रिय डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यातील २० शेतकºयांना ‘डाळिंब मित्र’ पुरस्कार देण्यात आला. सचिन देशमुख हे अमरावती जिल्ह्यातून कुऱ्हा येथील एकमेव सत्कारमूर्ती होते.इंजिनीअर असलेले सचिन देशमुख हे नोकरी सोडून चार वर्षांपासून संपूर्ण वेळ सेंद्रिय शेतीत करीत आहेत. एक उत्कृष्ट सेंद्रिय शेती उत्पादक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी रसायनमुक्त डाळिंब शेतीचा मार्ग शेतकऱ्यांना उपलब्ध केला आहे. त्यामुळेच नाशिक येथे झालेल्या डाळिंब उत्पादक परिसंवादात त्यांनी जिल्ह्याचे नेतृत्व करीत येथे जमलेल्या शेतकºयांना मार्गदर्शन केले.
कुऱ्ह्याचा शेतकरी ‘डाळींब मित्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:56 IST
येथील शेतकरी सचिन देशमुख यांना नाशिक येथे ‘डाळिंब मित्र’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यातील निवडक २० सत्कारमूर्तींमध्ये त्यांचा समावेश होता.
कुऱ्ह्याचा शेतकरी ‘डाळींब मित्र’
ठळक मुद्देनाशिकमध्ये सन्मान : राज्यातील २० शेतकऱ्यांचा समावेश