शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीचे वार, विटांनी ठेचून तरुणाची हत्या; तीन भावंडांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 01:29 IST

मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची कुºहाडीचे वार करून व विटांनी ठेचून हत्या केली. सौरभ राजेंद्र गोसावी (३५, रा. शेगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील रंगोली मंगल कार्यालयामागे सोमवारी रात्री घटना घडली.

ठळक मुद्देरंगोली मंगल कार्यालयामागील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या तीन भावंडांनी एका तरुणाची कुºहाडीचे वार करून व विटांनी ठेचून हत्या केली. सौरभ राजेंद्र गोसावी (३५, रा. शेगाव) असे मृताचे नाव आहे. ही धक्कादायक घटना गाडगेनगर हद्दीतील रंगोली मंगल कार्यालयामागे सोमवारी रात्री घटना घडली.पोलीस सूत्रानुसार, गजानन मोहोड, विजय मोहोड व राजा मोहोड (तिन्ही रा. शेगाव) अशी आरोपींची नावे आहेत. सौरभ गोसावी हा वाहनचालक होता. सोमवारी सौरभ सर्व कामे आटोपून शेगाव परिसरातील एका दारूच्या दुकानावर गेला होता. तेथे आरोपींनी त्याला दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. सौरभ नकार देऊन तेथून निघून गेला.दरम्यान आरोपींनी सौरभला रंगोली मंगल कार्यालयामागील परिसरात गाठले आणि त्याला मारहाण सुरू केली. मद्यधुंद आरोपी सौरभला बेदम मारहाण करीत होते. जबर मारहाणीत सौरभ जमिनीवर कोसळला. तरीसुद्धा आरोपींनी त्याला मारहाण सुरूच ठेवली.आरोपींनी कुºहाडीचे वार करून व विटांनी हल्ला करून सौरभला गंभीर जखमी केले. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सौरभला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक रक्तस्त्राव झाल्यामुळे सौरभचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक सौरभचे वडील राजू भाऊराव गोसावी (५६, रा. शेगाव) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हत्येचा व्हिडीओ व्हायरलसोमवारी सांयकाळी रंगोली मंगल कार्यालयामागील रोडवर सौरभची हत्या करण्यात आली. वर्दळीच्या रस्त्यावर सौरभवर हल्लेखोर हल्ला करीत असल्याचे अनेकांनी पाहिले. तीन व्यक्ती सौरभला बेदम मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ काही नागरिकांनी दुरूनच काढला. तो व्हिडीओ व्हॉट्सअ‍ॅपच्या विविध ग्रुपवर व्हायरल झाला आहे.

टॅग्स :Murderखून