शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

जळगांव आर्वीतच होणार कृषीसमृद्धी केंद्र

By admin | Updated: August 18, 2016 00:02 IST

राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून....

पालकमंत्र्यांनी केली जागेची पाहणी : -आता शासकीय भूखंडावरच साकारणार बिझनेस हब धामणगावरेल्वे : राज्याच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणारा तब्बल ७१० किमीच्या मुंबई-नागपूर महाराष्ट्र समृद्धि कॉरीडोर प्रकल्पांत स्मार्टसिटी जळगांव आर्वी येथेच होणार असून आता १४४ हेक्टरच्या शासकीय भूखंडातच हा हब साकारला जाणार आहे. याकरिता शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी स्पष्ट केले.मुंबई-नागपूर हा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५ गावांमधून जाणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी बुधवारी दुपारी तालुक्यातील दोन ठिकाणांची पाहणी केली. यवतमाळ-धामणगाव मार्गावरील सावळा फाटा येथे उड्डाणपुलाचे बांधकाम होणार आहे. जागेची पाहणी केल्यानंतर जळगांव आर्वी येथील औद्योगिक क्षेत्राची सुद्धा पालकमंत्र्यांनी पाहणी केली. मालधक्क्याचा दळणवळणासाठी वापरअमरावती : परिसरातील १४४ हेक्टरमध्ये शासकीय बिझनेस हब साकारला जाणार असून त्यासाठी शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार नाही, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रकल्पाकरिता जमिनीची कमतरता भासल्यास तिवसा मार्गावरील ६८ एकर प्रकल्पामुळे जळगांव औद्योगिक परिक्षेत्राचे रूप पालटणार असून परिसरातील शेकडो लोकांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. धामणगाव-जळगांव आर्वी हा रस्ता सुद्धा ६ पदरी करून त्यामार्गे धामणगाव रेल्वे येथील मालधक्क्याचा उपयोग दळणवळणासाठी केला जाणार आहे. एकंदरीत या संपूर्ण प्रकल्पात आता शासनाने आधी शासकीय जमिनचा वापर करुन हब साकारण्याची भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. जळगाव आर्वी येथील औद्योगिक परिक्षेत्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा नियोजन अधिकारी काळे, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे, राजगडकर, प्रवीण देसली, दिनेश विधाते, मंगेश कवाडे,श्रीकांत घुगे, जळगांव आर्वी येथील धीरज मुडे आदी उपस्थित होते.दत्तापूर पांदण रस्ता महामार्गाला जोडणारजळगाव आर्वी ते दत्तापूर या पांदण रस्त्याचा विकास करण्यात येणार असून त्या रस्त्याला महामार्गाशी जोडण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यावेळी दिली. या कॉरीडोर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.