शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

महसूलचा ‘केआरए’ आला

By admin | Updated: October 29, 2016 00:57 IST

महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे मूल्यमापन व्हावे,...

लासूर स्टेशन : दोन वर्षापूर्वी लग्न झालेल्या महिलेचे पहिले बाळंतपण धावत्या रेल्वेत झाल्याची घटना गुरुवारी रात्री मनमाड-सिकंदराबाद अजिंठा एक्सप्रेसमध्ये लासूर स्टेशन ते औरंगाबाद रेल्वे प्रवासादरम्यान घडली. विशेष म्हणजे ही प्रसूती मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी दोन तृतीयपंथीयांच्या मदतीने केली. सापुतारा एम. आय. डी. सी. मध्ये काम करणाऱ्या या कुटुंबाला धावत्या रेल्वेतच मदतकार्य मिळाल्याने त्यांना गहिवरून आले होते. हिंगोली जिल्ह्यातील जामडी गावातील एका कुटुंबातील गर्भवती महिला आपल्या पती, सासू, सासरे व अन्य नातेवाईकांसह दिवाळी सणानिमित्ताने गुरुवारी गावाकडे जाण्यासाठी अजिंठा एक्सप्रेसने निघाले होते. दरम्यान, इंजिनपासून क्रमांक दोनच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या सदर गर्भवती महिलेला करंजगाव ते लासूर रेल्वेस्टेशनदरम्यान प्रसूतीवेदना सुरु झाल्या. ही वेळ होती रात्री दहाची. याचवेळी लासूर रेल्वेस्टेशनवर नागपूर-मुंबई नंदीग्राम व अजिंठा एक्सप्रेस यांची क्रॉसिंगची वेळ झाली होती. विशेष म्हणजे या दोन्हीही एक्सप्रेस लासूर येथे दहा वाजून दहा मिनिटांनी पोहचल्या. गर्भवती महिलेला त्रास होत असल्याने गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची माहिती रेल्वेचे पॉइंटमन सीताराम पोलके यांनी स्टेशनमास्टर संजय बरनवाल यांना दिली.बरनवाल यांनी नांदेड नियंत्रण कक्षाला, तर रेल्वे प्रवासी सेनेचे सदस्य मनोज मुथा यांनी रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांना घटनेची माहिती दिली. सोमानी हे लगेचच रेल्वेस्टेशनवर पोहोचले. बरनवाल यांनी दहा ते पंधरा वेळा फोन करूनदेखील १०८ रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही.