शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

‘कोविड सेंटर’ नकोच, शेगाव-रहाटगाव मार्गावर चक्काजाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 05:01 IST

आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभावतो, अशी भीती त्यांनी पोलिसांपुढे स्पष्ट केली. शहराबाहेर अनेक मंगल कार्यालये व हॉल उपलब्ध आहेत.

ठळक मुद्देमहिलांचाही सहभाग : मंगल कार्यालयात ‘कोविड सेंटर’ प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेगाव-रहाटगाव मार्गावर तुळजा भवानी व विनय विला मंगल कार्यालयात कोविड-१९ सेंटर सुरू करण्याच्या निर्णयाला विरोध करून परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर उतरून शेगाव मार्गावर बुधवारी सकाळी १०.५० ते ११.३० दरम्यान चक्काजाम आंदोलन छेडले. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळेसाठी ठप्प झाली होती.आंदोलनाची माहिती मिळताच गाडगेनगर व नांदगावपेठ पोलिसांचा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, लोकवस्तीत कोविड सेंटरची उभारणी करू नये, अशी जोरदार मागणी महिला वर्गाने केली. परिसरात अनेक शाळा, महाविद्यालये आहेत. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका संभावतो, अशी भीती त्यांनी पोलिसांपुढे स्पष्ट केली. शहराबाहेर अनेक मंगल कार्यालये व हॉल उपलब्ध आहेत. आधी त्या ठिकाणी कोविड सेंटर उभारावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली. प्रहार संघटनेचे शहर अध्यक्ष चंदू खेडकर यांच्या नेतृत्वात शेगाव, रहाटगाव परिसरातील नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला. नांदगावचे पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांच्याशी चर्चा केल्यानंतर चंदू खेडकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून त्यांचे बोलणे करून दिले. जिल्हाधिकाऱ्यांशी माझी चर्चा झाली असून, या ठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात येणार नाही, असे आश्वासन डीसीपी सोंळके यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी चक्काजाम आंदोलन मागे घेतले. आंदोलनात महेश निमकर, गिरीश दिघेकर, प्रशांत मोहोड, श्याम कारेगावकर, मंगेश मोहने, अरुणा इंगोले, मनीषा मालठाणे, सीमा दुबे, शीला इंगळे, शुभांगी खुरपटे, शीला आळे, जयश्री भवरे, देऊबाई कारेगावकर, शीला पांडे, मीना टाले, नलिनी थोरात यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. गाडगेनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे ताफ्यासह घटनास्थळी उपस्थित झाले होते.

आंदोलकांची पोलिसांशी बाचाबाचीकोविड सेंटर रद्द करण्यासंदर्भात लेखी पत्र द्या, अन्यथा सेंटरमध्ये तोडफोड करू, असे एका महिलेने म्हणताच याच मार्गाने निघालेले शहर कोतवालीचे ठाणेदार शिवाजी बचाटे व नांदगावपेठ पोलीस आंदोलकांवर चिडले. त्यामुळे नागरिक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. अखेर चंदू खेडकर यांनी तोंडी आश्वासन मिळाल्याने आंदोलन तूर्तास मागे घेऊ, अशी शिष्टाई केली.

टॅग्स :Chakka jamचक्काजाम