शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

कोष्टी हे हलबा-हलबी नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:18 IST

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, चंद्रभान पराते जात प्रमाणपत्र प्रकरण अमरावती : काेष्टी हे हलबा किंवा हलबी नाहीत. त्यामुळे ते अनुसूचित ...

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, चंद्रभान पराते जात प्रमाणपत्र प्रकरण

अमरावती : काेष्टी हे हलबा किंवा हलबी नाहीत. त्यामुळे ते अनुसूचित जमातीचा लाभ घेऊ शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उपविभागीय अधिकारी चंद्रभान पराते यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. पराते यांच्या अपिलावर हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा विभागीय पडताळणी समिती व उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय उदय ललित व अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने १० ऑगस्ट रोजी हा महत्त्वाचा निकाल दिला.

आदिवासी समाजाच्या घटनात्मक हक्कावर गदा आणण्याची ओरड राज्यात होत असताना हा निकाल आला आहे. हलबा कोष्टी जात प्रमाणपत्राच्या आधारे तहसीलदारपदी नियुक्त झालेले चंद्रभान पराते यांचे प्रमाणपत्र नागपूर येथील अनुसूचित जमाती जातपडताळणी समितीने १ फेब्रुवारी २०१६ रोजी अवैध ठरविले होते. त्या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. तथापि, खंडपीठानेही ६ एप्रिल २०१६ रोजी त्यांची याचिका फेटाळली. पराते यांनी सर्वोच्च न्यायालयात दिवाणी अपील (क्र.३७०/२०१७) दाखल केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे अपील फेटाळून कोष्टी हे हलबा-हलबी नाहीत, असा निर्वाळा दिला आहे.

यापूर्वीसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद कटवारे प्रकरणात कोष्टी हे हलबा- हलबी नाहीत, असा निर्णय देऊन हा प्रश्न निकाली काढला होता. या निर्णयात मिलिंद कटवारे, माधुरी पाटील, जगदीश बहिरा आदी खटले तसेच महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अधिनियमांची चर्चा करण्यात आली आहे. आता सरकार काेणता निर्णय घेते, याकडे राज्यातील आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.

----------

बॉक्स

सरकार किंवा न्यायालयांना ’एसटी’ यादीत बदल करण्याचा अधिकार नाही

राज्य घटनेतील तरतुदीनुसार राज्य सरकार किंवा कोर्ट, न्यायप्राधिकरणाला अनुसूचित जमातीच्या यादीत बदल करण्याचा किंवा यादीबद्दल वेगळे मत देण्याचा अधिकार नाही. तसेच विशिष्ट जमात, जमाती समूह, जमात-जमाती समूह भाग राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या यादीत असल्याचा पुरावा सादर करण्यास किंवा चौकशी करण्यास परवानगी नाही. राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या अनुसूचित जमातीच्या यादीत एखाद्या जमातीचा समावेश करणे किंवा वगळणे हे अधिकार न्यायालयाला नसून फक्त संसदेला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालात स्पष्ट केले आहे.

------------------

कोट..

चंद्रभान पराते यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी, नागपूर येथे २४ व २५ सप्टेंबर २०२० रोजी, १३ व २३ ऑक्टोबर, २ नोव्हेंबर २०२० व ७ नोव्हेंबर २०२१ रोजी निवेदन दिले आहे. पण, अजूनही गुन्हे दाखल करण्यात आले नाही. जातपडताळणी कायद्यातील कलम १० व ११ नुसार सरकारने तत्काळ कारवाई करावी.

- शालिक मानकर, अध्यक्ष आदिवासी हलबा- हलबी समाज संघटना, गडचिरोली.

‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘‘

खुल्या प्रवर्गातून सेवेला संरक्षण

२०१३ मध्ये उच्च न्यायालयाने खुल्या प्रवर्गातून आपल्या सेवेला संरक्षण दिले आहे. त्या आदेशाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले नाही. दरम्यान, खुल्या प्रवर्गातून पदोन्नतीही देण्यात आली. हलबा जातीच्या दावा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अपील फेटाळले असल्याने यासंदर्भात पुढे काय करायचे, यावर कायद्यानुसार निर्णय घेतला जाईल.

- चंद्रभान पराते, उपायुक्त, नागपूर विभागीय आयुक्तालय