शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

कौंडण्यपूरचा अस्थीघाट घाणीच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 22:47 IST

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिविसर्जन घाटाला अस्वच्छतेने घेरले आहे. दूरवरून लोक येथे अस्थिकलश घेऊन, दशक्रिया करण्यासाठी येतात. गणपती व दुर्गादेवी विसर्जनसुद्धा याच ठिकाणी करण्यात येते. मात्र, अलीकडे हा परिसर इतका बकाल आणि अस्वच्छ झाला आहे की, येथील घाटाकडे पाय वळत नाहीत.

ठळक मुद्देमोक्ष मिळणार कसा? : शुल्क वसुली कशाची? सुविधांची वानवा

सूरज दाहाट।लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील अस्थिविसर्जन घाटाला अस्वच्छतेने घेरले आहे. दूरवरून लोक येथे अस्थिकलश घेऊन, दशक्रिया करण्यासाठी येतात. गणपती व दुर्गादेवी विसर्जनसुद्धा याच ठिकाणी करण्यात येते. मात्र, अलीकडे हा परिसर इतका बकाल आणि अस्वच्छ झाला आहे की, येथील घाटाकडे पाय वळत नाहीत.केरकचरा व निर्माल्य नदीकाठालगत साचले आहे. त्यामुळे श्रद्धेने येणाऱ्या नागरिकांना घाण व दुर्गंधीचा सामना करावा लागतो. नदीघाटावर पूजाविधी करण्यासाठी शुल्क आकारले जाते. जर शुल्क घेत असाल, तर किमानपक्षी आवश्यक सुविधा व स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी शुल्क जमा करणाऱ्यांची नाही का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अगदी घाटाशेजारी मलबा साचला असल्याने धार्मिक विधी करण्यास लोक धजावत नाहीत.वर्धा नदी अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही किंवा गाळही काढण्यात आलेला नाही. येथील स्वच्छता व इतर कारभाराची जबाबदारी कुणाची, हे समजायला मार्ग नाही. स्थानिक ग्रामपंचायतीचे या घाटाकडे संपूर्ण दुर्लक्ष आहे. अस्थिघाटावर सुरक्षा कठडे नसल्याने लोक थेट खोल पाण्यात जातात. नदीचा उपसा झाला नसल्याने अनेक जण त्यात जाऊन फसले आणि काहींचा मृत्यू झाल्याची बाब स्थानिक सांगतात. सुरक्षेच्या दृष्टीने येथे कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत .नागरिकांचा भ्रमनिरासघाटावर पूजाविधीसाठी शासकीय निधीमधून मोठे सभागृह बांधण्यात आले. मात्र, त्या सभागृहात पंखे, वीज, टेबल व अन्य सुविधा नाहीत. नागरिकांना बसण्यासाठी झाडे किंवा हॉटेल शोधावे लागते. नदीपात्रात उतरल्यानंतर अनुचित प्रसंग उद्भवल्यास साधी प्राथमिक व्यवस्थाही उपलब्ध नाही. त्यामुळे या घाटावर विधी करण्यासाठी आकारलेले शुल्क कशासाठी, हा प्रश्न निर्माण होतो.सदर अस्थिघाटाच्या देखभालीसाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. घाटाची देखरेख व स्वच्छतेची जबाबदारी संबंधित कंत्राटदाराची आहे. मात्र, कंत्राटदार अधिक रक्कम घेत असेल, तर कारवाई करण्यात येईल. अस्वच्छतेबाबत त्यास जाब विचारू.- रुचिता चव्हाणसरपंच, कौंडण्यपूर ग्रा.पं.