लक्षवेध, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा स्मृतीदिन
अमरावती : किसानपुत्र आंदोलन समितीच्यावतीने दरवर्षी साहेबराव करपे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९ मार्च हा दिवस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त येथील पंचवटी चौक स्थिती भाऊसाहेब उपाख्य डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळयासमाेर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नियम पाळून साजरे करण्यात आले.
किसानपुत्र आंदोलन समितीतर्फे १९ मार्च हा दिवस आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा स्मृती दिनानिमित्त एक दिवस अन्नदात्या साठी अन्नत्याग आंदोलन करून यानिमित्त शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करणे ही या आंदोलनामागील संकल्पना आहे. त्या पार्श्वभूमीवर किसानपुत्र आंदोलन समितीच्यावतीने हे आंदोलन राबविले जाते. शुक्रवारी पार पडलेल्या या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, विजय विल्हेकर, मनाली तायडे, राहुल तायडे, अमृता देशमुख, हरीश मोहोड, नितीन पवित्रकार, प्रमोद कुचे,भैय्यासाहेब निचळ, महेंद्र मेटे, उमेश वाकोडे, किरण महल्ले, सचिन नागमोते, गौतम खडसे, राजू भुयार, दीपक देशमुख, नरेंद्र मेंटकर, मारोती उमाळे, विनेश आडतीया, जितेंद्र शिंदें, प्रवीण काकड, रुपेश सवाई यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.