शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या पेन्शनसाठी किसान सभा रस्त्यावर

By admin | Updated: September 1, 2014 23:15 IST

देशात खासदार व आमदार असलेल्या लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना पेन्शन दिल्या जाते. मात्र देशाचा महत्त्वाचे घटक असलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा शासनाकडून दिला जात नाही.

अमरावती : देशात खासदार व आमदार असलेल्या लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांना पेन्शन दिल्या जाते. मात्र देशाचा महत्त्वाचे घटक असलेल्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा आर्थिक फायदा शासनाकडून दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावे, यासह इतर मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.किसान सभेच्या प्रमुख मागण्यांमध्ये लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांच्याप्रमाणेच ग्रामीण भागातील ६० वर्षांवरील शेतकरी, शेतमजूर यांना दरमहा पेन्शन लागू करावे, डॉ. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी, भू-संपादन कायदा २०१३ च्या प्रस्तावित बदलाचा तातडीने निर्णय मागे घ्यावा, आदिवासी वनहक्क मान्यता अधिनियम २००६ अन्वये शेतजमिनीचे पट्टे वितरीत करावे, सातबारा कोरा करावा आणि सरसकट कर्जमाफी द्यावी, सिंचन क्षेत्राचे रक्षण तथा संवर्धन करावे, भारनियमन बद करावे, अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान किसान सभेने दिलेल्या मागण्या शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी दिले. आंदोलनात अध्यक्ष नामदेव बदरके, अनिल वानखडे, अशोक सोनारकर, तुकाराम भस्मे, शरद सुरजुसे, शरद मंगळे, पंडित ढोके, संजय मंगळे, दिलीप नहाटे, जोशी सुनील घटाळे, बी.के. जाधव, जे.एम. कोठारी यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)