शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

‘राजा’ दुष्काळदाहात होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 01:17 IST

लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे.

ठळक मुद्देनेते प्रचारात मश्गूल : आठ तालुक्यांतील वेदना जाहीरनाम्यात बेदखल

गजानन मोहोड।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लोकसभा निवडणुकीत झाडून सारे नेते राजकारणी मतदारराजाच्या सेवेत लीन झाले आहेत. विविध आश्वासने देण्याची अहमहमिका लागली आहे. मात्र, स्वत: मतदारराजा दुष्काळदाहात होरपळला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या गदारोळात त्याचा आवाज दबला आहे. कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात त्याच्या वेदनेला स्थान मिळालेले नाही. निवडणुकीच्या गदारोळात खेडेगावांतील मतदारराजाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचे भान या नेत्यांना नसल्याची शोकांतिका आहे.प्रचाराची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. या स्थितीत दुष्काळदाहात होरपळणाऱ्या मतदारराजाची अवस्था मात्र बिकट झालेली आहे. शेतातील विहिरींचे दिवसागणिक खोल जाणारे पाणी त्याच्या डोळ्यांच्या धारांनीही भरून आलेलं नाही. जिवापाड जगविलेल्या संत्राबागेचं पान न पान गळायला लागलं, तसतसा बळीराजा आतून तुटला आहे. तसे पाहता जिल्ह्याच्या गावगावांत हीच स्थिती आहे. यंदाच्या खरिपात कमी पावसाने नगदी पिके गारद झाली. धारणी वगळता उर्वरित १३ तालुक्यांची पैसेवारी ही ५० च्या आत आहे. शासनाने मात्र कागदोपत्री छळ चालवित केवळ चिखलदरा, अंजनगाव सुर्जी, अचलपूर, चांदूरबाजार व मोर्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करून ‘एनडीआरएफ’च्या सवलती दिल्यात. उर्वरित दर्यापूर, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, तिवसा, वरूड व अमरावती तालुक्यात पैसेवारीच्या आधारावर दुष्काळस्थिती जाहीर केली. मात्र, कुठल्याच प्रकारचा निधी दिलेला नाही. आता तर निवडणुकांच्या गोंधळात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनाही याचा विसर पडलेला आहे.जिल्ह्यात सरासरीच्या २६ टक्के कमी पाऊस झाल्याने जिल्ह्याचे नगदी पीक सोयाबीनसह ६० दिवसांच्या कालावधीतील मूग व उडीददेखील उद्ध्वस्त झालेत. उत्पादनखर्चाच्या तुलनेत ५० टक्केही शेतमाल उत्पादन झालेले नाही. पावसाच्या दीर्घ दडीने कपाशी पिकाची वाढ खुंटली व गुलाबी बोंडअळीच्या तडाख्यात कापसाची वाट लागली.जिल्हा दुष्काळात होरपळत असताना शासनाने १३ तालुक्यांची पैसेवारी कमी लावून पाच तालुक्यांतच दुष्काळ जाहीर केला,तर उर्वरीत आठ तालुक्यांची सवलतीवरच बोळवण केली. ज्या तालुक्यांना मदत जाहीर केली, ती चार टप्प्यात देण्यात आली. त्यातही अर्ध्याअधिक शेतकºयांना आजही मदतनिधी मिळाला नाही, हे जिल्ह्याचे वास्तव आहे.७३१ दुष्काळी गावांची सवलतींवरच बोळवणजिल्ह्यातील कमी पैसेवारीच्या आठ तालुक्यांत शासनाने दुष्काळस्थिती जाहीर केली. या तालुक्यातील ७३१ गावे दुष्काळाची भीषण स्थिती अनुभवत आहेत. यात अमरावती तालुक्यातील १०५, भातकुली ६९, चांदूर रेल्वे ७४, धामणगाव रेल्वे ८३, नांदगाव खंडेश्वर १६१, चांदूर बाजार ८४ व दर्यापूर तालुक्यातील ८६ गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना शासनाने दुष्काळी मदतनिधी न देता केवळ आठ प्रकारच्या सवलतींवरच बोळवण केलेली आहे.१५ मंडळात दुष्काळ; मदतनिधी नाहीयंदा ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाच्या निकषावर जिल्ह्यातील १५ गावांना दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार दुष्काळ जाहीर केला; मात्र मदतनिधी दिलेला नाही. केवळ जमीन महसुलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, कृषिकर्जाच्या वसुलीस स्थगिती, शाळा- महाविद्यालयांची शुल्कमाफी, रोहयोच्या कामाच्या निकषात सुधारणा आदी सवलती जाहीर केल्यात. मात्र, यातील अनेक सवलतींचा लाभ शेतकरी व त्यांच्या पाल्यांना मिळालेला नाही, हे जिल्ह्याचे दुदैव आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकamravati-pcअमरावतीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019