शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

सोयाबीनचे क्विंटलऐवजी किलोत उत्पादन

By admin | Updated: October 30, 2014 22:45 IST

पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही.

चांदूरबाजार : पावसाचे अपुरे प्रमाण, अनियमित पाऊस, वातावरणातील बदल त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे. दिवाळीपूर्वी येणारे सोयाबीनचे पीक यंदा दिवाळी संपूनही हाती आले नाही. आले ते उत्पादन क्विंटलऐवजी किलोत आहे. त्यामुळे गणोजा, सोनोरी परिसरातील सोयाबीन उत्पादकांनी पीक काढणीचा खर्च तरी वाचेल म्हणून उभे पीकच वखरुन टाकले आहे.तालुक्यात २१ हजारांवर हेक्टरमध्ये सोयाबीनचे पीक होते. त्यात ६० टक्के शेतामधील सोयाबीनचे उत्पादन झाले तर ४० टक्के शेतातील सोयाबीन अज्ञात रोगामुळे पीक पूर्णपणे नष्ट झाले आहे. यावर कळस म्हणजे अत्यल्प प्रमाणात उत्पादन झालेले सोयाबीन कुठे विकायचे, अशी स्थिती आल्याने ते बाजारातून हरपले आहे. कापूस खरेदीचा मुहूर्त नसल्याने शेतकरी पूरता आर्थिक अडचणीत सापडला आहे. यात सुरुवातीला अस्मानी संकटाने समस्या निर्माण केली तर त्यानंतर तीन महिन्यापासून सरकारच अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांचा नेमका वाली कोण? असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.एकीकडे खरीप हंगाम हातचा गेला तर दुसरीकडे रबी हंगामाचे नियोजन आर्थिक अडचणींमुळे कोलमडले आहे. चारही बाजंूनी शेतकरी अडचणीत सापडला आहे. आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात, दिवाळीच्या मोसमात राज्यात एकाच दिवशी तब्बल सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे वास्तव विसरून चालणार नाही. सोयाबीनचे उत्पादन नाही. उत्पादन खर्चाचाही भुर्दंड शेतकऱ्यांवर बसला असताना रोखीचे पीक म्हणून आता शेतकऱ्यांचे भवितव्य कापसावर अवलंबून आहे. कापसाच्या हमी भावातही शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसत आहे. शासनाने यंदा कापसाचा हमीभाव जाहीर करताना क्विंटलमागे ५० रूपयाची वाढ करून शेतकऱ्याविषयीचा कळकळा दाखवून दिला आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झाली. खते, तणनाशके, किटकनाशके, मजुरीत प्रचंड वाढ झाली आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च एकरी १२ हजार रूपये आहे, बागायती कपाशी एकरी ३५ हजार तर कोरडवाहू १८ ते २० हजारापर्यंत उत्पादन खर्च येतो. सोयाबीन उच्च प्रतिचा ३ हजार तर कपाशी उच्च प्रतीची ३ हजार ८०० रूपये, कपाशीवरही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने काही ठिकाणी कापसाची झाडे उपटून हरभरा पेरण्यात आला. इतकी दयनीय अवस्था सध्या शेतकऱ्यांची झाली आहे. नेते मंडळी दोन महिन्यापासून निवडणुकीत व्यस्त होती तर शेतकरी पिकांचे भविष्य शोधत होता. निवडणुकीत आश्वासनाचा पूर वाहत असला तरी शेतकरी मात्र पावसाच्या एका थेंबासाठी तडफडत होता. आता तर रबी पिकासाठी जमिनीत ओलावा नाही, ही नवीन समस्या आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)