शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मारेकरी निघाला अट्टल चोरटा

By admin | Updated: October 5, 2016 00:21 IST

बडनेरानजीक झालेल्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पंकज गोंडाणे याने तब्बल ५१ घरफोडी केल्याची कबुली दिली.

१८० ग्रॅम सोने, १ किलो चांदी जप्त : ५१ घरफोडींची कबुलीअमरावती : बडनेरानजीक झालेल्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पंकज गोंडाणे याने तब्बल ५१ घरफोडी केल्याची कबुली दिली. यामध्ये नागपूरमधील ३५ व अमरावतीमधील १६ घरफोडींचा समावेश आहे. आरोपींवर हॉटेल अ‍ॅनेक्सचा वेटर अजित रमेश नाईकची चाकू भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी पंकजने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक करून १८० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी जप्त केली आहे. २४ सप्टेंबर रोजीच्या रात्री आरोपी सतीश पारवे (३०,रा.जेवडनगर) व त्याचा मित्र पकंज गोंडाणे हे दोघेही हॉटेल अ‍ॅनेक्समध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी अजित रमेश नाईक याच्यासह सचिन वानखडे व संदीप पाटील यांच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात अजित नाईकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झालेत. याप्रकरणात बडनेरा पोलिसांनी सतीश पारवे व पंकज गोंडाणेला अटक केली. बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येसोबतच घरफोडीच्या घटनांची कबुली दिली. पंकज गोंडाणे याने केलेल्या घरफोडीच्या घटनामधील ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. पकंजने दागिने आरोपी गजानन लक्ष्मण राखोंडे (३९,रा. विजय नगर) याला दिले. त्याने ते प्रवीण लोणकर याला विकले. त्यामुळे दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक, उपायुक्त शशिकुमार मिना व एसीपी मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पीआय डी.एम.पाटील, एपीआय जी.के.मेहेत्रे, पीएसआय बंदखडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुलतकर, पोलीस शिपाई दिपक सुंदरकर, मोहन तायवाडे, श्याम तायडे, शंकर मुळे, सुनिल सोळंके, संतोष यादव, संदिप देशमुख, आशिष करपे, सागर सरदार, ईकबाल चव्हाण यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)