शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुनी येथील नऊ वर्षीय मुलाचे अपहरण अन् हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:51 IST

तालुक्यातील दुनी येथे एका युवतीला फोनवर बोलण्यास बाध्य करण्यासाठी १९ वर्षीय युवकाने तिच्या नऊ वर्षीय भावाची गळा दाबून हत्या केली. या बालकाचा मृतदेह पोटीलावा जंगलात मिळाला.

लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : तालुक्यातील दुनी येथे एका युवतीला फोनवर बोलण्यास बाध्य करण्यासाठी १९ वर्षीय युवकाने तिच्या नऊ वर्षीय भावाची गळा दाबून हत्या केली. या बालकाचा मृतदेह पोटीलावा जंगलात मिळाला. धारणी पोलिसांनी युवकाला अटक केली असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे.पोलीस सूत्रांनुसार, दुनी येथील रोशन नंदलाल कासदेकर (९) मृत मुलाचे नाव, तर रवि मोतीलाल जावरकर (१९ रा. पाटकहू) असे मारेकऱ्याचे नाव आहे. रविचे रोशनच्या बहिणीसोबत दोन वर्षांपासून प्रेमप्रकरण होते. त्याने तिला फोनवर बोलण्यासाठी तसेच प्रत्यक्ष बोलण्यासाठी दबाव टाकत, तसे न केल्यास रोशनला जिवे मारण्याची धमकी तीन दिवसांपूर्वी दिली होती. वर्ग तिसरीचा विद्यार्थी असलेल्या रोशनला त्याने बुधवारी शाळा सुटल्यावर दुपारी १२ वाजता वाटेत गाठले आणि बाइकवर बसवून पोटीलावा जंगलात नेले. तेथे रोशनची गळा दाबून हत्या केल्यानंतर रवि हा त्याच्या गावाकडे निघून गेला.दरम्यान मुलगा घरी न आल्याने नंदलाल कासदेकर व कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. कुठेही न मिळाल्याने अखेर धारणी पोलिसांत रात्री साडेनऊच्या सुमारास तक्रार दिली. तक्रारीत त्यांनी रवि जावरकर याच्याविरुद्ध संशय व्यक्त केला व मुलीला मिळालेल्या धमकीबाबत सांगितले. पोलिसांनी रविला गुरुवारी सकाळी ६ वाजता राहत्या घरून ताब्यात घेतले आणि चौकशीसाठी धारणी ठाण्यात आणले. त्याने रोशनची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. धारणीचे एसडीपीओ पोलीस भरतीसाठी गेल्याने अंजनगाव येथील सुनील जायभाये यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहंदुले, सहायक निरीक्षक राजू चव्हाण, कर्मचारी बाबूलाल कासदेकर, अनुराग पाल, प्रभाकर डोंगरे, बालापुरे तपास करीत आहेत.रवि जावरकरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मिळाले आहेत.आरोपीने दिली खुनाची कबुली, ७ पर्यंत कोठडीरोशन होता हुशारतीन वर्षांपासून शाळेत असलेला रोशन हा कायम दुसऱ्या क्रमांकाने पास होत होता. यामुळे त्याच्या अपहरणाची माहिती मिळताच शिक्षक शालिनी पाखरे, राजदीप गुडधे, गोहलकर, योगिता उन्हाते यांनीही त्याचा शोध घेतला.

टॅग्स :Murderखून