शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
अनर्थ टळला! टेकऑफ घेण्याआधीच विमानात तांत्रिक बिघाड; पायलटच्या सतर्कतेमुळे १७७ प्रवासी सुरक्षित
3
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; कवीने परत केला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
4
'आप'ने पुन्हा पाडलं भाजपाच्या गडाला खिंडार; पोटनिवडणुकीतील दणदणीत विजयाची ५ कारणे काय?
5
३ मुलांच्या आईचं १४ वर्षांचं अफेयर, तिसऱ्याची एन्ट्री झाली अन् पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
'या' नवरत्न स्टॉकनं केलं मालामाल; १ लाख रुपयांचे झाले १ कोटींपेक्षा अधिक, कोणता आहे शेअर?
7
"आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ" परराष्ट्र धोरणावरून काँग्रेसची सरकारवर टीका
8
तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल! १ जुलैपासून आधार लिंक नसेल तर मिळणार नाही तिकीट
9
मराठमोळ्या अभिनेत्याने या कारणामुळे केली आत्महत्या, पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
10
अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बची ताकद किती? हा बॉम्ब कुणी बनवला?
11
बाजारात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना पाहून करत होता अश्लील इशारे;२० वर्षीय तरुणाला पोलिसांनी केली अटक
12
Inflation: २० वर्षांनंतर एक कोटींचं मूल्य असेल फक्त २५ लाख; महागाई कशी कमी करतेय तुमच्या पैशांचं मोल?
13
आम्ही ४ वर्षांपासून बोलत नव्हतो! संजय कपूर यांच्या निधनानंतर बहिणीची पोस्ट, म्हणाली- "जे काही घडलं ते भयानक..."
14
काळ आला होता पण..; घरगुती सिलिंडरचा भीषण स्फोट, पाहा अंगावर काटा आणणारा Video
15
'आम्हाला तिथेच लढायचेय' इराण-इस्रायल, अमेरिका युद्धात WWE का इरेला पेटला...
16
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?
17
"तुम्ही विमान उडवण्याच्या लायक नाही, जा बूट...", इंडिगोच्या प्रशिक्षणार्थी पायलटचा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर जातीभेदाचा आरोप; एफआयआर दाखल
18
Cluster Bomb: क्लस्टर बॉम्ब म्हणजे काय, १२३ देशांमध्ये त्यावर बंदी का?
19
गुजरातमध्ये 'आप'कडून मोदी आणि भाजपाला जबर धक्का, पोटनिवडणुकीत मिळवला दणदणीत विजय
20
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार देण्याची शिफारस आली अंगलट; पाकिस्तानी नेत्यांची पुन्हा फजिती

रघुवीरमधील कामगारांच्या वैद्यकीय तपासणीला ‘खो’

By admin | Updated: September 22, 2016 00:12 IST

रघुवीरमधील कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एफडीए : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ अमरावती : रघुवीरमधील कचोरीत आढळलेल्या अळीमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, त्यापेक्षाही गंभीर प्रकार म्हणजे रघुवीरमधील कामगारांची नियमित वैद्यकीय तपासणीच केली जात नसल्याचे निरीक्षण अन्न व औषधी प्रशासनाने नोंदविले आहे. आजारी असलेले कामगार खाद्यान्न बनवितात किंवा ग्राहकांना सर्व्ह करतात, या प्रकाराने लाखो ग्राहकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो. शाम चौकस्थित रघुवीर प्रतिष्ठानातील कचोरीत अळी आढळल्याचे वृत्त 'लोकमत'ने प्रकाशित करताच शहरात खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रघुवीर प्रतिष्ठानासह मुख्य कारखान्यावर धाड टाकली. तेथील खाद्यान्न व कच्च्या मालाची तपासणी करून नमुने घेतले. दरम्यान ज्या ठिकाणी खाद्य पदार्थ बनविले जातात, त्या परिसराची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये त्यांना अनेक प्रकारच्या त्रुट्या आढळून आल्या. नियमावलीनुसार रघुवीरमधील कामकाज चालत नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. यावेळी एफडीए अधिकाऱ्यांनी कामगारांच्या वैद्यकीय तपासणीसंदर्भात चौकशी केली असता त्यांची नियमीत वैद्यकीय तपासणी होत नसल्याचे निदर्शनास आले. कामगारांची वैद्यकीय तपासणी न केल्यामुळे रघुवीरचे संचालक अधिकाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखविण्यास असमर्थ ठरले. याबाबत एफीएच्या अधिकाऱ्यांनी नोंद घेतली आहे. रघुवीरमधील कामगार हॅन्डग्लोजविना खाद्यान्न तयार करतात, अन्य कामगार तेच खाद्य पदार्थ ग्राहकांना पुरवितात. या कामगारांपैकी काही कामगार संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असतील व ते खाद्यान्न तयार करत असतील, तर रघुवीरने ग्राहकांचे आरोग्यच पणाला लावले असल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले.रघुवीर प्रतिष्ठानाची तपासणीदरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. तेथील कच्चा मालाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवालानंतर पुढील कारवाई दिशा निश्चीत केली जाईल. - जयंत वाणे, प्रभारी सहायक आयुक्त, (अन्न).