शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वरूड खुर्द येथे खरीप पीक शेती दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:13 IST

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील वरूड खुर्द (कालवाडा) येथे रतन बोदरे यांच्या शेतात शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. ...

अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील वरूड खुर्द (कालवाडा) येथे रतन बोदरे यांच्या शेतात शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी विस्तार अधिकारी साहेबराव पखान होते. भिलोना येथील कृषी तंत्रनिकेतनचे प्राचार्य एस.पी.काळे, कृषी अधिकाऱ्यांनी यात मार्गदर्शन केले. शेती शाळा समन्वयक रूपेश हरणे, विहिगाव, अडगाव, खुदानपूर, वरूड खुर्द, कालवाडा येथील प्रयोगशील शेतकरी, कृषिताई, कृषिमित्र, समूह सहायक शिवम भांबूरकर, शेतीशाळा प्रशिक्षक कमल उके, नितिकेश निर्मळ, राहुल देशमुख, गौरव पवार, पवन हूड, विशाल सोळंखे उपस्थित होते.

----------

आसेगावात रस्त्यात चुलीवर स्वयंपाक

आसेगावपूर्णा : गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ चांदूर बाजार राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने आसेगाव पूर्णा येथे ६ फेब्रुवारी रोजी महिलांच्या उपस्थितीत चुलीवर स्वयंपाक करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाध्यक्ष आशा गोटे, सुग्राबी अजीज, नलिनी खडसे, वैशाली काळमेघ, ग्रामपंचायत सदस्य सुमित्रा गवई, शारदा करडे, मीना वाटाणे, कोल्हे आदी पदाधिकारी उपस्थित होते. गॅस सिलिंडरला हार घालून आंदोलन सुरू करण्यात आले.

------------

स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वितरण

धामणगाव रेल्वे : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी, यासाठी धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप अडसड यांनी १०.५० लाख रुपये किमतीची पुस्तके वाचनालय व ग्रामपंचायतीत उपलब्ध करून दिली. धामणगाव नगर परिषद, तळेगाव दशासर, देवगाव ग्रामपंचायत, चांदूर रेल्वे, आमला विश्वेश्वर, मालखेड, कारला, अंजनसिंगी येथील वाचनालय, पळसखेड ग्रामपंचायत, नांदगाव खंडेश्वर, माहुली चोर, मंगरूळ चव्हाळा, लोणी, सावनेर, कणी मिझार्पूर येथील वाचनालय, येनस, पापळ ग्रामपंचायतींमध्ये ही पुस्तके देण्यात आली.

--------------------

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची कार्यकारिणी

मोर्शी : स्थानिक हनुमान मंदिरात बैठकीमध्ये मोर्शी तालुका अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तालुकाध्यक्षपदी कीर्तेश शर्मा, युवा मंचाच्या अध्यक्षपदी पंकज शर्मा, महिला तालुकाध्यक्षपदी शोभा गौड, महिला जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून अरुणा मिश्रा यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष शशांक दुबे, पप्पू छांगाणी, दीपेंद्र मिश्रा, निखिल ओझा, राजू शर्मा, दीपक पुरोहित, योगेश पुरोहित, मुन्ना चौबे, पिंकल पुरोहित, प्रकाश दुबे, कविता शर्मा, प्रिया शर्मा उपस्थित होते.

------------------------

घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेचे आयोजन

चांदूर बाजार : छत्रपती शिवरायांचा विचार घराघरांत नेण्याकरिता सुरू झालेली घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धा यावर्षी राज्यस्तरावर घेण्यात येणार आहे.

स्पर्धेत मावळ्यांनी १९ ते २१ फेब्रुवारी दरम्यान घरीच सजावट करून त्यांचे छायाचित्र संयोजकांच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठवायचे आहेत. नावीन्यपूर्ण व अभिनव अशा सजावटीला परीक्षक भेटी देतील. यातून उत्कृष्ट सजावटीला बक्षिसे देण्यात येतील. या स्पर्धेचे आयोजन ‘आम्ही सारे शिवप्रेमी’च्यावतीने करण्यात आले. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व जिजाऊ ब्रिगेड या स्पर्धेचे संयोजक आहेत. या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन तुषार देशमुख, माधुरी भदाने, भाष्कर निर्मळ, सीमा बोके, क्षिप्रा मानकर, मनाली तायडे, लीनता पवार, सुमीत रिठे, नीरज बुटे, सुधाकर सरकचौरे, अजित काळबांडे, अमर वानखडे, प्रज्वल टापरे, गौरव भोकसे, रिधेष ठाकरे यांनी केले आहे.

--------------------------------------------

मेळघाटसंदर्भात उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

चिखलदरा : पुढील अर्थसंकल्पात मेळघाट विधानसभा क्षेत्रातील विकास कामांना प्राधान्य देण्याची मागणी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी अमरावती येथे आयोजित जिल्हा नियोजन आराखडा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदनाद्वारे केली. धारणी तालुक्यातील भडगाव मध्यम प्रकल्पाचे उभारणीचे काम जलद गतीने सुरू असून यावर्षी यात पाणी साठवण केली जाणार आहे. प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेला मंजुरी प्रदान करून पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, सोबतच धारणी शहरातील प्रशासकीय इमारतींसाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, चिखलदरा पर्यटन स्थळावर आॅक्सिजन पार्क निर्मिती करिता प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

-------------