फोटो पी २१ सीपी
पान ३
अमरावती : रविवारपासून गणेश विसर्जन सुरू झाले असून, ते २२ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालयातील शहर व ग्रामीण भागात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. बंदोबस्तात कोठेही अडचण निर्माण होऊ नये, म्हणून सर्व पोलीस अंमलदार यांना जागेवरच फुड पॅकेटची व्यवस्था करण्यात आली होती.
पोलीस आयुक्त डाॅ. आरती सिंह यांनी गणेश विसर्जनकरिता लावलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली, तसेच बंदोबस्तातील अधिकारी, अंमलदार यांच्यासोबत चर्चा करून त्यांना आवश्यक सूचना दिल्यात. पोलीस उपायुक्तद्वय विक्रम साळी व शशीकांत सातव हेदेखील सतत पेट्रोलिंग करून बंदोबस्तावर देखरेख करीत आहेत.
पोलीस आयुक्तांनी छत्री तलाव, प्रथमेश तलाव तसेच शहर व ग्रामीण भागातील विसर्जनस्थळी त्याचप्रमाणे महानगरपालिकाकडून ठेवण्यात आलेल्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भेटी देऊन बंदोबस्तातील अधिकार, अंमलदार यांना सूचना दिल्यात. तसेच वाहतूक शाखेतील अधिकारी, अंमलदार यांना छत्री तलाव, प्रथमेश तलाव येथील वाहतूक नियोजनाबाबत सूचना दिल्यात.
१९ सप्टेंबर रोजी एकूण १६४ सार्वजनिक गणेश मंडळाचे शांततेत विसर्जन झाले, असून साधारणत: १२ ते १५ हजार घरगुती गणेशाचे विसर्जन झाले आहे.