हे छायाचित्र आहे अमरावती येथील व्याघ्र प्रकल्प कार्यालयाच्या आवारातील. मंगळवारी दुपारी १२.३९ वाजता वनकर्मचारी मस्तपैकी एक्का-बादशाहच्या डावात रमले होते. शासकीय कर्तव्यावर असलेल्या कर्मचाºयांनी शासकीय गणवेश परिधान करून बराच वेळ असे डाव खेळले. हे डाव खेळण्यासाठी चहुबाजूंनी शासकीय वाहने उभी करून शिताफीने जागा तयार करण्यात आली होती. खेळणारे आणि खेळू न शकणारे सारेचजण या डावात किती रममान झाले होते, हे छायाचित्रातून अचूकपणे लक्षात येतेच. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी आणि अमरावतीचे उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्या कार्यालयाच्याच आवारात दिवसाढवळ्या हे घडत असेल तर जंगलातील स्थितीची कल्पनाच काय करावी ? (छायाचित्र : मनीष तसरे)
जंगल के रखवाले:
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 22:50 IST