शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
2
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
3
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
4
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
5
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
6
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
7
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
9
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
10
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
11
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
12
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
13
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
14
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
15
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
16
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
18
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
19
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
20
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!

अर्धशतकी वाटचालीत रुजविला सांस्कृतिक ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 22:33 IST

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासनाचा 'अ' दर्जाप्राप्त चार वाचनालये आहेत. त्यापैकी एक तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे आहे. या शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात १९७० साली अवघ्या १०० पुस्तकांवर झाली.

ठळक मुद्दे१०० पुस्तकांपासून सुरुवात : शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय वाचन संस्कृती रुजविणारे

रितेश नारळे ।आॅनलाईन लोकमतकुऱ्हा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शासनाचा 'अ' दर्जाप्राप्त चार वाचनालये आहेत. त्यापैकी एक तिवसा तालुक्यातील कुऱ्हा येथे आहे. या शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाची सुरुवात १९७० साली अवघ्या १०० पुस्तकांवर झाली. ग्रामस्थांच्या मदतीने अर्धशतकी वाटचालीत या ग्रंथालयाने राज्यस्तरावर नोंद घेतला जाणारा सांस्कृतिक ठेवा गावात रुजविला.कुऱ्हा हे तिवसा तालुक्यातील २५ हजार लोकसंख्येचे गाव. बबनराव बिंड यांनी येथे शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालयाचा पाया रचला. २०१२ ला वाचनालयाला 'अ' दर्जा मिळाला. येथे दररोज १०० पेक्षा जास्त विद्यार्थी, नागरिक वाचनासाठी येतात. याशिवाय ५४३ वाचक खातेदार आहेत. वाचनालयात बाल विभाग, महिला विभाग, वाचन कक्ष, कम्प्यूटर विभाग, मुलांसाठी अभ्यासिका, संदर्भ विभाग असे स्वतंत्र विभाग पाडले आहेत. पुस्तकांची संख्या सद्यस्थितीत १९ हजार ४२८ आहे. दररोज विविध १८ वृत्तपत्रे येतात. साप्ताहिके, मासिके, पाक्षिके यांची संख्या १०७ आहेत. वाचकांना इंटरनेट सुविधा, संदर्भ संकलनासाठी झेरॉक्स उपलब्ध आहे. विद्यार्थी येथील सुविधांचा उपयोग घेतात. कोलकाता येथील राजाराम मोहन रॉय संस्थेकडून इमारत बांधकामासाठी ४ लाख ४७ हजारांचा निधी मिळाला. बाहेरगावावरून आलेल्यांना सुटीच्या दिवशीही कर्मचारी पुस्तक उपलब्ध करून देतात.अनेक मान्यवरांच्या भेटीबरीच राजकीय मंडळी, नेते साहित्यिक वाचनालयाला भेट देऊन गेले आहेत. सन १९९६ ला उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी भेट देऊन ५० हजार रुपये देणगी बांधकामासाठी दिली. नितीन गडकरी, प्रमोद महाजन, माजी आमदार शरद तसरे, साहित्यिक विद्याधर गोखले, पु.ल. देशपांडे असे इतरही मान्यवरांनी येथे भेटी दिल्या आहेत.कुऱ्हा महोत्सव अन् विविध उपक्रमवर्षभर विविध कार्यक्रम प्रबोधन, व्याख्यान, मार्गदर्शन, पुस्तक प्रदर्शन, उपक्रम सुरू असतात. गावातील सर्व वर्गातील नागरिक जाती-धर्मातील लोकांच्या एकीकरणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ‘आपलं गाव आपला उत्सव - कुऱ्हा महोत्सव’ यांसारख्या विविधतेने नटलेल्या कार्यक्रमांचे आयोजन ते दरवर्षी करतात.आरोग्यसेवाही पुरविण्याचा मानसवाचनालयाच्या माध्यमातून गावातील मुलांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना आपण आणखी काय देऊ शकतो, यासाठी प्रयत्न केले जातात. लोकवर्गणीतून होणाऱ्या मदतीतून भविष्यात वाचनालयामार्फत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस विद्यमान सचिव विवेक बिंड यांनी व्यक्त केला आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या माध्यमातून मदत व्हावी, तसेच वाचनातून मुलांमधून चांगली व्यक्ती घडविण्याचा आमचा उद्देश आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया मुलांनी आम्हाला सांगावे, त्यांना कोणते पुस्तके पाहिजे, ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. गावातील मुलांचे उज्ज्वल भविष्य घडावे, हाच आमचा मानस आहे.- गिरीधर रोडगे,अध्यक्ष, शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय, कुºहा