शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काझीपेठ-पुणे एक्स्प्रेस थांब्याचा प्रस्ताव फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 23:46 IST

येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.

ठळक मुद्देचांदूरवासीयांच्या आशा मावळल्या : खासदारांचे प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर रेल्वे : येथील रेल्वे स्टेशनवर काझीपेठ-पुणे या गाडीच्या थांब्याबाबत नागपूर रेल्वे बोर्डातून पाठविलेला प्रस्ताव मुंबई येथील रेल्वे मुख्यालयाने फेटाळल्याची माहिती रेल रोको कृती समितीचे अध्यक्ष नितीन गवळी यांनी माहिती अधिकाराच्या पत्रातून मिळविली.पूर्व व पश्चिम विदर्भातून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात असल्याने काझीपेठ ते पुणे रेल्वेगाडी दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू झाली. मात्र, या गाडीला चांदूर रेल्वे येथे थांबा नसल्याने तालुक्यात नाराजीचा सूर पसरला आहे. चांदूर रेल्वे येथे महाराष्ट्र एक्सप्रेस वगळता पुण्याकडे जाणाºया एकाही गाडीचा थांबा नाही. येथे थांबा आवश्यक आहे. कारण पुण्याला जाणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक प्रमाणात आहे.रेल रोको कृती समितीने पुण्याला जाण्यासाठी एका रेल्वे गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती. खासदार रामदास तडस यांनीदेखील रेल्वे बोर्डाला पत्र देऊन पुणे-काझीपेठ या गाडीला चांदूर रेल्वे व हिंगणघाट स्थानकांवर थांबा देण्याची मागणी २० आॅक्टोबर २०१७ रोजी केली होती. यावरून रेल्वे बोर्डाने २६ नोव्हेंबर २०१७ रोजी दोन्ही स्थानकांवर या गाडीचा थांबा परिचालन दृष्टीने व्यावहारिक असल्याच्या पत्रासह प्रस्ताव मुंबई मुख्यालयात पाठविला. परंतु, मुख्यालयाने ७ मार्च २०१८ रोजी हिंगणघाट स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव मान्य केला, तर चांदूर रेल्वे स्टेशनवर थांब्याचा प्रस्ताव धुडकाून लावला आहे. सदर माहिती नितीन गवळी यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविल्याची माहिती आहे.या गाडीचा थांबा मिळवूनच देणार, अशी आशा खा.रामदास तडस हे सात महिन्यांपासून चांदूर रेल्वेवासीयांना दाखवित होते. परंतु, ही आशा आता मावळली आहे.गरीबरथचा थांबा मिळवून देतो -तडसएकेवेळी काझीपेठ-पुणे या गाडीला चांदूर रेल्वेत थांबा मिळणारच, असे सांगणारे खासदार रामदास तडस यांच्याशी एका समारंभात स्थानिक पत्रकारांनी याविषयी चर्चा केली व प्रस्ताव फेटाळल्याचे लक्षात आणून दिले. तडस यांनी चांदूर रेल्वे स्थानकावर आता गरीबरथ एक्सप्रेसचाच थांबा मिळवून देणार असल्याचे वक्तव्य यावेळी केले. या वक्तव्यावरून खा. तडस काझीपेठ-पुणे गाडीच्या थांब्याबाबत किती प्रयत्नशील होते, हे दिसून आल्याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.