शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्टेट बँकेच्या पुढ्यात खुपसली 'कट्यार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 23:49 IST

मोझरी परिसरातील पेट्रोल पंपवर मध्यरात्री दरोडा, तिवसा शहरात पोलिसांच्या घरात घरफोडी अशा घटनांनी तिवसा तालुका हादरला असताना, मंगळवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात ‘कट्यार’ खुपसलेली आढळून आली. त्यामुळे आधीच रामभरोसे असणाऱ्या सुरक्षेबाबत गावकºयांच्या मनात भीतीचे सावट उमटले आहे.

ठळक मुद्देनागरिकांमध्ये चर्चा : गुरुकुंजाची सुरक्षा अद्यापही रामभरोसे

लोकमत न्यूज नेटवर्कगुरुकुंज (मोझरी) : मोझरी परिसरातील पेट्रोल पंपवर मध्यरात्री दरोडा, तिवसा शहरात पोलिसांच्या घरात घरफोडी अशा घटनांनी तिवसा तालुका हादरला असताना, मंगळवारी सकाळी भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात ‘कट्यार’ खुपसलेली आढळून आली. त्यामुळे आधीच रामभरोसे असणाऱ्या सुरक्षेबाबत गावकºयांच्या मनात भीतीचे सावट उमटले आहे.भारतीय स्टेट बँकेची गुरुकुंजाची शाखा महामार्गालगत असून, एकदा कुख्यात चोरट्यांनी या बँकेला लक्ष्य केले आहे. तिवसा तालुक्यातील मागील काही दिवसांतील घटनाक्रम बघता, येथील सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. चक्क पोलिसाच्या घरातच चोरट्यांनी हात साफ करून हा मुद्दा ऐरणीवर आणला. कधीकाळी गुरुकुंजातील पोलीस चौकीवर आठ गावांच्या सुरक्षेसाठी चार कर्मचारी तैनात राहायचे. रात्रीच्या वेळी पोलीस वाहनाने गस्त घातली जायची. पण, कालांतराने कर्मचारी कपात केली गेली. त्यासाठी राहण्याची गैरसोय, कर्मचाºयांचा तुटवडा आदी कारणे दिली गेली. मोझरी विकास आराखड्यात आता चौकीची इमारत उत्तम उभारली आहे . फक्त आवश्यकता आहे २४ तास कामावर तैनात कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाºयांची.गुरुकुंज मोझरीपासून हाकेच्या अंतरावरील मोरे पेट्रोल पंपवर दरोडा पडला आणि पाठोपाठ तिवसा शहरात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या. त्यातच गुरुकुंजातील भारतीय स्टेट बँकेच्या पुढ्यात कट्यार खुपसली असल्याचे आढळले. याच परिसरात मोठ्या संख्येने डॉक्टर होऊ पाहणारे बीएएमएस अभ्यासक्रमाचे विद्यार्थी वातव्यास राहतात. या मित्र-मैत्रिणींचा घोळका याच परिसरात रात्रीच्या अंधारात अनेकदा नागरिकांच्या निदर्शनास येतो. त्याचा या कट्यारशी काही संबंध आहे का, या चर्चेला उधाण आले आहे.तक्रार नाही...: जमिनीत खुपसून ठेवलेली कट्यार बँक उघडण्याच्या सुमारास तेथे नव्हती. त्यामुळे या बाबीची माहिती घेतल्यानंतर तक्रार देऊ, असे बँकेतर्फे याप्रकरणी कळविण्यात आले.