शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दारूबंदी करण्याकरिता करजगाववासी सरसावले

By admin | Updated: July 24, 2015 00:12 IST

तालुक्यातील करजगाव (गांधीघर) येथे अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री सुरु आहे.

आक्रमक : तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण सुरू वरूड : तालुक्यातील करजगाव (गांधीघर) येथे अनेक दिवसांपासून अवैध दारुविक्री सुरु आहे. येथील एका हॉटेलमध्ये दारुविक्री होत असल्याने गावातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत. वारंवार तक्रारी करुनही पोलिसांनी दखल घेतली नसल्याने अखेर महिला बचतगट, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत पदाधिकारी दारुबंदीकरिता सरसावले असून स्थानिक तहसील कार्यालयापुढे शेकडो लोकांनी उपोषण सुरु केले आहे. तालुक्यातील करजगाव (गांधीघर) येथे अवैध दारुविक्रीला उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी लगतच्या मिर्झापूर खदानीजवळ महिला बचतगटातील महिला व गावकऱ्यांनी दारु पकडून पोलिसांच्या ताब्यात दिली होती. पोलिसांनी आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला होता. परंतु त्यानंतर पुन्हा करजगावच्या बसथांब्याजवळ विनापरवानगी हॉटेल सुरु झाले असून या हॉटलेमध्ये दारुविक्री होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यामुळे गावातील कायदा, व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे तसेच मद्यपींचे संसार वाचविण्याच्या दृष्टीने तातडीने या हॉटेलमधून होणारी दारुविक्री बंद करावी, अशी मागणी सरपंच सत्यवान ढोले, उपसरपंच सतीश बोहरुपीसह ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, शेकडो महिला-पुरुषांनी केली आहे. यासाठी तहसीलपुढे मंगळवारपासून उपोषण सुरु केले. याला काँग्रेस, युवक काँग्रेसने पाठिंबा दर्शविला असून यावेळी माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम ठाकरे यांनीदेखील समर्थन दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)