जीवघेणे : लाल करण्यासाठी केमिकल युक्त कलरचा वापर संदीप मानकर अमरावतीउन्हाळयातील प्रखर उष्म्यापासून आल्हाददायक दिलासा देणारे रसाळ फळ म्हणजे कलिंगड. मात्र, आंबा, केळींपाठोपाठ आता बाजारात विषयुक्त कलिंगड येत आहेत. टरबूजाला गर्द लाल रंग देण्यासाठी त्यामध्ये चक्क केमिकलयुक्त इंजेक्शनचा सर्रास वापर होत आहे. टरबूज लाल करण्यासाठी वापरण्यात येणारा कृत्रिम रंग मानवी शरिरासाठी अतिशय हानिकारक असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. आंबे व केळी पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाईडचा मोठया प्रमाणात वापर होत असल्याचे निदर्शनास आले. केमिकल्सचा सर्रास वापर करून फळे पिकविली जात असल्यामुळे कर्करोगासारखे भंयकर आजार बळावत आहेत. या प्रकारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अन्न, प्रशासन विभागाचे अधिकारी मात्र सुस्त आहेत. गुरुवारी तीन ठिकाणी धाडीअमरावती : शहरात कलिंगडची मोठी बाजारपेठ आहे. पूर्णा नदीच्या पात्रात कलिंगडाची शेती केली जाते. अकोला मूर्तिजापूर, बुलडाणा येथून गावरानी तर रायपूर येथून औषधी इंजेक्ट करून लाल केलेले कलिंगड अमरावतीत येत आहे. येथील बाजार समितीच्या आवारात दररोज सकाळी ५ ते ६ वाजता कलिंगडचा लिलाव होतो. यातून कोट्यवधींची दररोज विक्री होते. शहरातील ७०० ते ८०० हातगाडीधारक फेरीवाले, किरकोळ व्यवसायिक येथून टरबूजांची घाऊक भावात खरेदी करतात. एक दिवस कापून ठेवलेले कलिंगड लगेच खराब होते. कारण ही फळे पिकविण्यासाठी प्रचंड प्रमाणात रसायनांचा मारा केला जातो. कमी कालावधीत पिकविलेली फळे बाजारपेठेत विक्रीस आली आहेत. कमी वेळेत अधिक उत्पादन घेऊन आर्थिक लाभासाठी नागरिकांच्या जिविताशी खेळ होत आहे.वृत्तामुळे अन्न, प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग आली. त्यांनी बाजार समितीतील तीन फळविक्रेत्यांकडे धाडी टाकून कॅल्शियम कार्बाईडने पिकविलेल्या फळांच्या तपासण्या केल्यात. यावेळी एका ट्रकचीही पाहणी केली. परंतु काहीही हाती लागले नाही. पूर्णा नदीच्या पात्रात व नदीशेजारी विविध प्रजातीच्या लहान कलिंगडचे उत्पादन घेतले जाते. याचा आकार वाढविण्यासाठी अनेक प्रकारच्या पेस्टीसाईड्स व खतांचा वापरही केला जातो. कुठल्याही कृषीसेवा केंद्रात ते उपलब्ध होते. ते शासनमान्य असल्याने याचा धोका नसल्याचे कृषी सेवा केंद्राच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. टरबूज मोठे करण्यासाठी सायरस, जिर्गोरिक अॅसिडची टरबूजाच्या वेलीवर फवारणी केली जाते. ०५२-३४ हे पेस्टीसाईड वापरले जाते. यामध्ये मोनो पोटॅशिअम फोस्फेट नावाचा घटक असल्यामुळे टरबूज मोठे व टवटवीत दिसते. हे अधिकृत असले तरी इतर विषारी रासायनिक औषधाची टरबूजांवर फवारणी होत असल्यामुळे ते शरीराला हानीकारक आहे. अन्न, प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मिलींद देशपांडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी ‘नॉट रिचेबल’ होता. रसायनयुक्त ‘रेड पिगमेंटचा’ वापर टरबुजांना लालजर्द करण्यासाठी रसायनयुक्त ‘रेड पिगमेंट’चा वापर केला जातो. टरबूज रायपूरहून अमरावतीत येतात. येथील बाजार समितीमध्ये सकाळी ३ ते ४ वाजता दरम्यान ट्रक दाखल होतात. अमरावतीत येणाऱ्या टरबुजांमध्येही रासायनिक रंग प्रविष्ठ केलेला असतो. एफडीएने नमुने घेतल्यास सप्रमाण ते सिद्ध होवू शकेल. सुरू असलेल्या या जिवघेण्या खेळापासून नागरिक मात्र अनभिज्ञ असतात. शहरात दररोज ७० ते ८० क्विंटल टरबूजांचा लिलाव होतो. येथूनच शहरात त्यांचे विविध हातगाड्यांवर वितरण केले जाते.
कलिंगडही विषाक्त !
By admin | Updated: April 30, 2016 00:09 IST