शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पुतण्याच्या हत्येप्रकरणी काकाला जन्मठेप

By admin | Updated: January 23, 2015 00:40 IST

पुतण्याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवीत न्यायालयाने आरोपी काकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

तळेगाव दशासर : पुतण्याची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवीत न्यायालयाने आरोपी काकाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. अमरावती येथील जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक २ एस. एस. दास यांच्या न्यायालयाने मंगळवार २० जानेवारी रोजी हा निकाल दिला. तळेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत धामक येथील लक्ष्मण आकाराम इंगोले (५५) असे शिक्षाप्राप्त आरोपीचे नाव आहे. लक्ष्मणने ४ फेब्रुवारी २०१२ रोजी शेतीच्या पैशाच्या वादातून पुतण्या सुधाकर जयराम इंगोले (४५, रा. धामक) याची हत्या केली होती. पैशाच्या हिस्सेवाटणीवरून लक्ष्मण व सुधाकर यांचेमध्ये वाद होऊन सुधाकरची हत्या झाली. प्रथम सुधाकरने लक्ष्मणला काठीने मारहाण केली त्यानंतर लक्ष्मण घरी गेला आणि विळा आणून त्याने सुधाकरवर आठ वार केले. डॉक्टरांनी सुधाकरला मृत घोषित केले. तळेगाव पोलिसांनी ५ फेब्रुवारी २०१२ ला लक्ष्मणला पोलिसांनी अटक केली. न्यायालयात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. ५ साक्षीदार फितूर झाले. साथीदारांचे बयाण आणि पुराव्याच्या आधारावर न्यायालयाने सुधाकरच्या हत्येप्रकरणी लक्ष्मणला दोषी ठरवित त्याला २० जानेवारी रोजी न्यायमूर्ती दास शेषन कोटाने आरोपीविरुद्ध निकाल दिला की कलम ३०२ भादंविमध्ये जन्मठेप व ५००० दंड तसेच कलम ३०७ भादंविमध्ये पाच वर्षे कैद व ३००० रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील म्हणून देशमुख यांनी तर आरोपीची बाजू मिश्रा यांनी मांडली.