शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ग्रामीण पोलीस दलात 'काका-दीदी' उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 23:20 IST

शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना या उपक्रमाबाबतचे आदेश दिले आहेत.

ठळक मुद्देडीएसपींचे आदेश : चिडीमारीला बसणार आळा, गुन्हेगारांची माहिती होण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना होणारा त्रास तसेच त्यांना माहिती पडणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत आता पोलीस काका व दीदी याकडे विशेष लक्ष देणार आहेत. पोलिसांविषयी असलेली भीती दूर व्हावी व शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी निर्भय राहावे, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांनी सर्व ठाणेदारांना या उपक्रमाबाबतचे आदेश दिले आहेत.पोलीस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या नवीन उपक्रमासाठी पथक नेमण्यात आले आहे. पथकद्वारे विविध शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना माहिती दिली जात आहे. शालेय विद्यार्थ्यांनी इंटरनेटचा वापर टाळावा तसेच ब्ल्युव्हेल, लुडो, तीनपत्ती पबजी खेळांपासून दूर राहावे, तसेच घरबसल्या आॅनलाईन तक्रार कशी करावी, यासह पोलीस प्रशासनातील कामकाजासंदर्भात माहिती दिली जाईल. यासाठी विद्यार्थ्यांना पोलीस काका व दीदीचा मोबाईल क्रमांक देण्यात येणार आहे.पोलीस काका, दीदी यांनी परस्पर संवादी जागरूकता कार्यक्रमात वाहतूक आणि रस्ते सुरक्षा, सायबर गुन्हे, माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ अल्पवयींनावर होणारे लेंगिक गुन्हे, रॅगिंग, ड्रग्ज, इतर विषयावर त्यांना मार्गदर्शन करावे लागणार आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग यांच्या नियमित संपर्कात राहावे, शाळा भेट रजिस्टर ठेवावे व त्याच्या नोंदी रजिस्टरमध्ये घ्याव्या लागणार आहे. त्याचबरोबर शाळेच्या सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व इतर महत्त्वाच्या कामात सहभागी होऊन त्यांना पोलिसांची कामे व कर्तव्याबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सूचित करावे, विविध वयोगटातील विद्यार्थांना चांगला स्पर्श व वाईट स्पर्श याविषयी जागरूकता निर्माण करावी लागणार आहे. पोलीस काका व दीदीवर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी देखरेख करणार आहेत.कुठल्याही क्षणी दूरध्वनीवरून संपर्क केल्यास पोलीस ताबडतोब मदतीला धावून येतील. त्यामुळे निर्भयपणे परिसरात घडणाºया गुन्ह्याच्या घटनांची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना केले जाणार आहे. त्याचबरोबर अमरावती ग्रामीण पोलीस विभागांतर्गत तालुकास्तरीय तसेच इतर भागातील कॉलेज व शाळांच्या भेटी घेऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येणार आहे.या उपक्रमातंर्गत विद्याथीर केंद्रबिंदू असणार आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढविणे, शिक्षकांची भेट घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न, समस्यांवर पोलीस लक्ष ठेवणार आहे. शाळांमध्ये रजिस्टरमध्ये असलेल्या नोंदीची दखल घ्यावी लागणार आहे. यात कर्तव्यात कसूर होता कामा नये, याची दखल घेण्यात येणार आहे.दर महिन्याच्या ५ तारखेला द्यावा लागणार अहवालपोलीस काका व दीदी पथकाच्या उपक्रमाबाबत काय उपाययोजना केल्याबाबतचा अहवाल सर्व ठाणेदारांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जीविशा घटकात द्यावी लागणार आहे, हे विशेष.अनुचित घटनेबद्दल तत्काळ माहितीशालेय परिसरात किंवा इतरत्र अनुचित प्रकार घडत असेल किंवा विद्यार्थिनींची कोणी छेड काढत असेल तर निर्भयपणे या घटनेबाबत पोलिसांना माहिती द्यावी, असे कळविले आहे.पोलीस काका-दीदी उपक्रम सोबत इतर पाच उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू असणार आहे. त्यानुसार उपाययोजना केल्या जातील.- दिलीप झळकेजिल्हा पोलीस अधीक्षक