शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कँसरशी झुंजणाऱ्या मित्रासाठी कबड्डी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:10 IST

कबड्डी संघातील जिवाभावाच्या सोबत्याला रक्तकर्करोगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सोबत्यांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर उपचार व्हावेत, या जिद्दीने कबड्डीची प्रत्येक लढत, स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांची धडपड पाहून गावातूनही मदती ओघ सुरू झाला आहे. ही कहाणी आहे.

ठळक मुद्देबक्षिसाच्या रकमेतून करताहेत उपचार : गावातूनही वाढला मदतीचा ओघ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव पेठ : कबड्डी संघातील जिवाभावाच्या सोबत्याला रक्तकर्करोगातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या सोबत्यांची धडपड सुरू आहे. त्याच्यावर उपचार व्हावेत, या जिद्दीने कबड्डीची प्रत्येक लढत, स्पर्धेत ते सहभागी होतात. त्यांची धडपड पाहून गावातूनही मदती ओघ सुरू झाला आहे. ही कहाणी आहे. नांदगावपेठ येथील तरुणांची.टोल नाक्यावर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया केवळ २१ वर्षे वयाच्या वृषभ दादाराव बानासुरे या कबड्डीपटूला अचानक ब्लड कॅन्सरचे निदान झाल्याने नांदगाव पेठमधील कबड्डीपटूंनी त्याच्या उपचारासाठी कबड्डीचे सामने खेळून व त्यातील येणाºया बक्षिसामधून आपल्या मित्राला वाचविण्यासाठी धडपड सुरु केली आहे. उपचाराच्या खर्चात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून दिवस-रात्र तहान व भूक विसरून नांदगावचे कबड्डीपटू सामने लढत आहेत. आजवर अनेक सामने ज्याने जिंकून दिले, तो आता मृत्यूलाही जिंकणारच, असा विश्वास या कबड्डीपटूंना आहे.संयमी, शांत स्वभाव असलेला वृषभ लहानपणापासून कबड्डीचा खेळाडू आहे. घरची परिस्थिती बेताची असून, तोच कुटुंबाचा आधारस्तंभ आहे. काही दिवसांपूर्वी त्याला ब्लड कँसरचे निदान झाले. सध्या नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कँसर हॉस्पिटलला त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आपला मित्र या दुर्धर आजाराने ग्रासला असून, आता उपचाराची खरी गरज असल्याने कबड्डीपटूंनी वेगवेगळ्या गावांत जाऊन सामने खेळून मिळालेल्या बक्षिसाची रक्कम उपचारासाठी दिली आहे. चाळीस हजार रुपयांची रक्कम वृषभच्या उपचारासाठी त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर अजूनही अनेक सामने ते वृषभसाठी खेळणार आहेत. सोशल मीडियावर याबाबत आवाहनदेखील करण्यात आले असून, सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.आजवर कबड्डीचे अनेक सामने आम्ही सोबत खेळलो, जिंकलो अन् हरलो. आता मात्र वृषभच्या आयुष्याचा सामना जिंकायचा आहे. या दुर्धर आजारातून त्याला बाहेर काढायचे आहे. आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे प्रयत्न करीत आहोत. आम्हाला आशा आहे, वृषभ आयुष्याचा हा सामना नक्की जिंकेल.- चंद्रशेखर सुंदरकर, कबड्डीपटू, वीर केसरी क्रीडा मंडळ, नांदगावपेठ

टॅग्स :cancerकर्करोगKabaddiकबड्डी