शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या सहा तासांत ‘ते’ दोघे हवालातीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:14 IST

अमरावती : चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अवघ्या सहा तासांत हवालातीआड करण्यात आले. राजापेठ पोलिसांनी ...

अमरावती : चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अवघ्या सहा तासांत हवालातीआड करण्यात आले. राजापेठ पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री ही यशस्वी कारवाई केली. विनय ऊर्फ चिंटू मोहोड (४३, रा. जेवडनगर, अमरावती) व कामेश नितनवरे (३०, रा. दसरा मैदान झोपडपट्टी, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

९ सप्टेंबर रोजी सायंकाळदरम्यान राजापेठ हद्दीतील हिंमत पेट्रोल पंप, जुना बाय पास रोडवर अज्ञात आरोपींनी चाकूचा धाक दाखवून एका इसमाकडील रोख रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीच्या जबानी रिपोर्टवरून राजापेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंविचे कलम ३९३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल करताच ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या नेतृत्वात एक तपास पथक रवाना करण्यात आले. दरम्यान, तपासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात दोघेही बंदिस्त झाले होते. त्या माहितीवरून विनय ऊर्फ चिंटू मोहोडचा शोध घेण्यात आला. त्याला मार्डी येथून अटक करण्यात आल्यानंतर ‘खाकीच्या करिश्म्याने’ त्याने जोडीदाराचे नावदेखील सांगितले. त्याचा साथीदार कामेश नितनवरे याला दसरा मैदान झोपडपट्टी भागातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चाकू व विना नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली. सदर गुन्ह्याचा तपास राजापेठ पोलिसांनी केवळ सहा तासांत लावून आरोपींना अटक करण्यात यश प्राप्त केले.