शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींच्या गर्दीने स्टेशन मार्ग ठप्प

By admin | Updated: April 26, 2017 00:23 IST

रेल्वे स्थानक मार्गावरील दारु दुकानासमोर मद्यविक्रीचे एकमेव दुकान राहिल्यामुळे येथे मद्य खरेदी करणाऱ्यांची चिक्कार गर्दी पहावयास मिळते.

बडनेऱ्यात प्रवासी त्रस्त : बंदोबस्ताची मागणीबडनेरा : रेल्वे स्थानक मार्गावरील दारु दुकानासमोर मद्यविक्रीचे एकमेव दुकान राहिल्यामुळे येथे मद्य खरेदी करणाऱ्यांची चिक्कार गर्दी पहावयास मिळते. तसेच या मार्गावर प्रचंड वर्दळ राहत असून प्रवाशांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकापासून हाकेच्या अंतरावर जयस्वाल यांचे वाईन शॉप आहे. बडनेऱ्यात व परिसरात हे एकमेव वाईन शॉप असल्यामुळे दुरदुरुन मद्यपी या ठिकाणी मद्य खरेदी करण्यासाठी येतात. सकाळी दुकान उघडण्यापूर्वीच मद्यपींची मोठी गर्दी झालेली असते. एकमेव दुकान असल्याने दिवसभर झुंबड असते. सायंकाळी हे दुकान लवकरच बंद होत असल्याने तेव्हा दुकानासमोर मोठी गर्दी वाढते. एखाद्या यात्रेत जशी गर्दी असते, अशी झुंबड या ठिकाणी असते. यामुळे मात्र रेल्वे स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तेथून प्रवाशांना आपली वाहने काढताना उगाचच वेळ जातो. अनेक प्रवाशी कसाबसा मार्ग काढून रेल्वे गाड्या पकडीतआहे. तर काहींच्या रेल्वे गाड्या या मार्गावरील मद्यपींच्या गर्दीमुळे सुटत असल्याचे संतप्तपणे प्रवाशी वर्गांमध्ये बोलले जात आहे. बडनेरा शहरात व परिसरात कुठेच दारू मिळत नसल्यामुळे या एकमेव वाईन शॉपीवर मद्यपींची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत आहे. रेल्वे पोलिसांसह शहर पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे, असे प्रवासी वर्गामध्ये बोलले जात आहे. दुकान उघडताना व बंद करताना जास्त गर्दी वाढत आहे. त्या वेळेस पोलीस तैनात असावे. ज्यामुळे रेल्वे स्थानक मार्ग मोकळा राहील व प्रवाशाचीही सोय होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)