शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधा योजना मंजुरीच्या जोखडात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 23:10 IST

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदान २०१७-१८ च्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या नियोजनातून २१० कामांची यादी झेडपी सभेच्या मान्यतेने जिल्हा प्रशासनाकडे मार्च महिन्यात पाठविण्यात आली आहे. मात्र, या कामांना अद्याप जिल्हा नियोजन समितीकडून हिरवी झेंडी मिळाली नसल्याने जनसुविधा योजना मंजुरीच्या जोखडात अडकली आहे.

ठळक मुद्देमान्यतेची प्रतीक्षा : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदान २०१७-१८ च्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या नियोजनातून २१० कामांची यादी झेडपी सभेच्या मान्यतेने जिल्हा प्रशासनाकडे मार्च महिन्यात पाठविण्यात आली आहे. मात्र, या कामांना अद्याप जिल्हा नियोजन समितीकडून हिरवी झेंडी मिळाली नसल्याने जनसुविधा योजना मंजुरीच्या जोखडात अडकली आहे.जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदानासाठी ५ कोटी ५५ लाख ५० हजार रुपयांची तरतूद जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाली होती. यामधील ५५ लाख ५० हजार रुपये मागील जुनी, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीस्तरावर वितरित करण्याकरीता प्राप्त झाले होते. यापैकी १ लाख ५७ हजारांची रक्कम जिल्हा परिषदस्तरावर अखर्चित असून, सदर रकमेसह ५०१.३५ लाख रुपये अनुदान २०१७-१८ चे नियोजन करण्यात आले असून, ५०१.५७ च्या दीडपट म्हणजेच ७५२.३५ लाख रुपयांच्या नियोजनाकरिता जिल्हा परिषदेला ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेले १०३३ कामे व ५०.८८ लक्षच्या कामांचे संकलित प्रस्तावास जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेने मंजूरी दिली आहे. त्यानुसार १७ फेब्रुवारी २०१८ च्या अन्वये १४ पंचायत समिती अंतर्गत २१० कामांचे ८ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकासकामांना सर्वसाधारण सभेत ठराव क्र. २१ ला मंजुरी दिली. त्यानुसार जनसुविधेच्या कामांना मंजुरीचा प्रस्ताव झेडपीने जिल्हा नियोजन समितीकडे पाठविला आहे. मात्र, अद्याप जिल्हा नियोजन समितीने या प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याचे जनसुविधेच्या मान्यतेची प्रतीक्षा जिल्हा परिषद सदस्यांना लागली आहे.जनसुविधेतील २१० कामासाठी सुमारे ८ कोटी ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव डीपीसीकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. प्रस्तावाला अद्याप मान्यता मिळाली नाही परिणामी कामे सुरू करता येत नाही. त्यामुळे या प्रस्तावास त्वरित मंजुरी द्यावी- नितीन गोंडाणे, अध्यक्ष जिल्हा परिषद