शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

३० जूनपासून राज्यातील ग्रामसेवकांचे पुन्हा आंदोलन

By admin | Updated: June 21, 2014 23:47 IST

शासन आणि प्रशासन स्तरावर मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. येत्या ३० जूनपासून अमरावतीसह

अमरावती : शासन आणि प्रशासन स्तरावर मागील कित्येक वर्षांपासून प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उपसले आहे. येत्या ३० जूनपासून अमरावतीसह राज्यातील ग्रामसेवकांनी बेमुदत काम बंद अांदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्वी प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्यावतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले होते. मात्र, या आंदोलनादरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे ग्रामसेकांनी आंदोलन स्थगित केले होते. या आंदोलनाची शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. परिणामी शासनाने ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर कराव्यात, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार (नरेगा) साठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा सेवाकाळ रुजू झाल्यापासून गृहित धरावा, २० ग्रामपंचायतींमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करावे, अशा विविध मागण्यांसाठी पुन्हा ग्रामसेवकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयांतर्गत करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३० जून रोजी जिल्ह्यातील ग्रामसेवक सर्व ग्रामपंचायतींच्या चाव्या, शिक्के, संबंधित पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करणार आहेत. याशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चादेखील काढण्यात येईल. २ जुलैपासून बेमुदत काम बंद अांदोलन सुरू करून २ ते १५ जुलै पर्यंत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले जाईल. या आंदोलनात जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कमलाकर वनवे यांनी केले आहे.