शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

२५ ग्राहकांना मिळतोय महिन्याकाठी न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:08 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देग्राहक मंच : व्यापाऱ्यांच्या पिळवणुकीपासून नागरिक सजग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडून महिन्याकाठी तब्बल २२ ते २५ ग्राहकांना न्याय दिल्या जात असून, त्यामुळेच जिल्ह्यातील ग्राहक व्यापाºयांच्या पिळवणूक व फसवणुकीतून सजग होत चालले आहे. २८ वर्षांत ग्राहक मंचाकडून ७ हजार ७३ जणांना न्याय देण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा पूर्ण करताना नागरिकांना ग्राहक बनून व्यापाऱ्यांकडून विविध प्रकारचा माल खरेदी करावा लागतो. मात्र, ग्राहक देवता म्हणून समजण्याची पद्धती तुरळक ठिकाणी पाहायला मिळते. ग्राहक हा व्यापाऱ्यासाठी देवता असतानाही अनेक व्यापारी वर्ग वस्तु विकल्यानंतर ग्राहकांना विसरून जातात. त्यातून ग्राहकांचे समाधान झाले का, याकडे व्यापारी दुर्लक्षच करताना आढळतो. ग्राहकांना वस्तू व सेवा पुरविण्याचे काम व्यापाऱ्यांचे आहे. त्यासाठी ग्राहकांना विविध अधिकार दिले असून, त्या नियमांच्या चाकोरीत बसून व्यापाऱ्यांनी ग्राहकांना वस्तु व सेवा पुरविणे आवश्यक आहे. मात्र, बरेचदा व्यापारी वर्ग ग्राहकांची पिळवणूक किंवा फसवणूक करताना आढळून येतात. बरेचसे ग्राहक व्यापाºयाच्या पिळवणुकीला बळी पडतात, तर काही तुरळकच ग्राहक न्यायासाठी झटतात. ग्राहकांनी सजग राहून आपल्या हक्कासाठी ग्राहक मंचाकडे न्यायासाठी तक्रार करणे आवश्यक असते. अमरावतीमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाने गेल्या २८ वर्षांत तब्बल ७ हजार ७३ ग्राहकांना न्याय दिला आहे.या प्रकारातील ग्राहकांना मिळाला न्यायग्राहक मंचाकडून विविध प्रकारचे ग्राहक न्याय मागण्यासाठी येतात. त्यात बँक, रेल्वे, एअरलाईन्स, विमा, टेलीकॉम, पोस्टल, हाऊसिंग सोसायटी एन्ड बिल्डींग, इलेक्ट्रिसिटी, मेडिकल निग्लेजन्सी, डिफेटिव्ह हाऊसिंग होल्ड गूडस, शिक्षण, रोड ट्रान्सपोर्ट, प्रवासी वाहतूक अशा आदी ग्राहकांना ग्राहक मंचात न्याय मिळाला.२३२ प्रकरणे प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे १९९० ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत ७ हजार ३३९ ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी ७ हजार ९१ तक्रारींचा निपटारा करण्यात आला. अद्याप २३२ प्रकरणे प्रलंबीत आहेत.१८७ तक्रारी प्रलंबितजिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे प्राप्त तक्रारींच्या निपटारानंतर काही विरोधी पक्ष निर्णयाचे पालन करीत नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला प्रकरण दाखल करावे लागते. आतापर्यंत १८७ प्रकरणे प्रलंबित आहेत.