शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
2
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
3
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
4
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
5
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
6
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
7
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
8
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
9
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
10
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
11
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
12
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
14
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
15
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
16
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
17
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
18
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
19
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
20
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन प्रवास

By admin | Updated: February 5, 2017 00:11 IST

नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील पापळनजीकच असलेल्या हिवरा (मुरादे) येथील नाथजोगी समाजाच्या ४९ कुटुंबीयांना २८ वर्षांपासून कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन जगावे लागत आहे.

कधी मिळणार हक्काचे घरकूल ? : हिवरा मुरादे येथील नाथजोगी कुटुंबीयांची व्यथानंदकिशोर इंगळे पापळनांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील पापळनजीकच असलेल्या हिवरा (मुरादे) येथील नाथजोगी समाजाच्या ४९ कुटुंबीयांना २८ वर्षांपासून कुडाच्या भिंती अन् ताडपत्रीच्या छतात जीवन जगावे लागत आहे. हक्काच्या घरकुलाची आशा बाळगणाऱ्या या नाथजोगी कुटुंबीयांना दोन तपाच्या प्रतीक्षेनंतरही निवासाची सोय नसणे ही शोकांतिका आहे. हक्काचे घरकूल मिळणार की, बेघरच राहावे लागणार, असा प्रश्न या कुटुंबीयांसमोर निर्माण झाला आहे. ४० कुटुंबीयांच्या वस्तीत २०० लोकांची राहुटी असलेल्या नाथजोगी बांधवांना अत्यंत दारिद्र्याचे जीवन जगावे लागत आहे. २८ वर्षांपासून हिवरा (मुरादे) येथे या नागरिकांचे वास्तव्य आहे. या वस्तीतील नागरिक गावोगावी भटकंती करतात, तर महिला गवताच्या पेंढ्या गोळा करून आपल्या कुटुंबीयांची कशीबशी उपजिवीका भागवितात. शासकीय योजना काय आहेत, त्याचा लाभ कसा घ्यायचा, या बाबींपासून या वस्तीतील नागरिक अनभिज्ञ आहेत. या वस्तीतील नागरिकांचा दोन तपापासून फक्त राजकारणापुरताच वापर झालेला आहे. मतदान कार्डाव्यतिरिक्त या नागरिकांकडे दुसरे कुठलेही शासकीय कार्ड नाहीत. साधी विद्युत व्यवस्था या वस्तीत नाही. रस्त्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात ही वस्ती संपूर्ण चिखलमय राहते. शिक्षणाचा त्या वस्तीतील नागरिकांना साधा गंधही नाही. या वस्तीतील नागरिक सुशिक्षित नाही. या वस्तीत ४० ते ५० लहान मुले आहेत. त्यांची शिक्षणापासून परवड होत आहे. त्या वस्तीतील फक्त ५ मुले शाळेत जातात. शिक्षण महर्षींच्या परिसरात शिक्षणाची विदारक स्थिती असणे, ही फार मोठी शोकांतिका आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ५० वर्षांपासून शाहिरी करणाऱ्यांची वाणी स्तब्धआमच्या प्रतिनिधीने भेट दिली असता या वस्तीत एक भयाण वास्तव नजरेस आले. या झोपडीत एक शाहीर राहत असून ५० वर्षांपासून समाज प्रबोधन करून आपल्या शाहीरीतून समानतेचा संदेश देणारा बाळू शंकर पवार हा शाहीर याच झोपडीत राहत आहे. दोन तपाच्या कालखंडात आमच्यासाठी निवाऱ्याची साधी व्यवस्थासुद्धा झालेली नाही. जीवन जगताना आमची फार मोठी अवहेलना होत आहे. एकीकडे आम्ही जनतेला समानतेचा संदेश देतोय. परंतु आम्हाला साधी निवाऱ्याचीही सोय नाही. हे आमचे उघड्यावरच जीवन समाज व्यवस्था सांभाळणाऱ्यांना नजरेस येत नाही का? ही खंत व्यक्त करताना या शाहिराचे डोळे पाणावले अन् त्याची वाणी स्तब्ध झाली.