शेतकऱ्यांना दिलासा : संततधार पाऊ स, सर्वच पिकांना संजीवनी अमरावती : ११ दिवसांच्या दडीनंतर सोमवार दुपारपासून संततधार पावसाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊ स होत आहे. पिकांना आवश्यकता असताना वरुणराजाची कृपा झाल्याने सर्वच पिकांना जीवदान, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहणाऱ्या सर्वच घटकांना हा पाऊ स सुखावणारा ठरला आहे. यंदाच्या हंगामात पावसाने १२ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले. पाच दिवसांनंतर १७ ते २३ जूनदरम्यान जिल्ह्यात दमदार पाऊस पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या. मात्र पावसाने नंतर प्रदीर्घ दडी मारली. त्यानंतर २७ दिवसांनी १९ जुलैला पावसाचे आगमन झाले. त्यानंतर ३ दिवसांनी पुन्हा पावसाने दडी मारली जी सोमवार ३ आॅगस्टपर्यंत आता जिल्ह्यात सद्यस्थितीत झडसदृश स्थिती आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. सोमवार ते मंगळवार सकाळी ८ वाजतापर्यंत जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वच तालुक्यात कमी अधिक प्रमाणात ँपाऊस पडला आहे. शहरात वृक्ष कोलमडले; फुले मार्केटमध्ये शिरले पाणीअमरावती : चौवीस तासांच्या संततधार पावसामुळे शहर ओलेचिंब झाले असून समर्थ हायस्कुलजवळील एक वृक्ष कोलमडून खाली पडले तर गांधी चौकातील एका मार्केटमध्ये पाणी शिरले आहे. अग्निशमन विभाग व आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेऊन वृक्ष तोडून मार्गाच्या बाजूला केले आहे, तसेच मार्केटमधील पाणी पंपाद्वारे बाहेर काढले. शहरातील नाले ओसंडून वाहू लागले असून विविध परिसरातील मार्ग पाण्याने तुडंूब भरले आहेत. नाल्याकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. समर्थ हायस्कुलजवळील व बॉम्ब शोधक पथक विभागाजवळ असे दोन वृक्ष कोलमडून मार्गावर पडली होती. आपत्कालीन पथकाने वृक्ष कापून मार्ग मोकळा केला. अग्निशमन विभागाचे अधीक्षक भरतसिंह चव्हाण यांच्या नेत्तृत्त्वात आपत्कालीन पथक नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहे.
जी व दा न
By admin | Updated: August 5, 2015 00:31 IST