शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

परतवाड्यात जीपगाडीने उडविला थरकाप

By admin | Updated: April 27, 2016 00:08 IST

सोमवारी सायंकाळी ६ वाजता वेगाने जीप चालवित सुटलेल्या चालकाने लाल पुलाजवळ दुचाकीस्वारांना धडक देऊन जखमी केले.

दोघे गंभीर : ‘मोनी’च्या समयसुचकतेने पूर्णानगरजवळ जाळ्यात अडकलापरतवाडा : सोमवारी सायंकाळी ६ वाजता वेगाने जीप चालवित सुटलेल्या चालकाने लाल पुलाजवळ दुचाकीस्वारांना धडक देऊन जखमी केले. अपघात होताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनी इर्शिद या युवकाच्या समयसुचकतेने त्याला आसेगाव पोलिसांनी पूर्णानगरजवळ पाठलाग करून अडविण्यात यश मिळविले. परतवाडा शहरात मागील पंधरा दिवसांपासून अपघाताचे सत्र सुरू आहे. अश्यातच सोमवारी सायंकाळी ६ वाजता लालपूल येथील भुलभुलय्या पॉर्इंटनजीक पांढऱ्या रंगाच्या बोलेरो क्रमांक एमएच ४५ ए. ७७४७ ने परतवाडा येथून अमरावतीकडे जाणाऱ्या एमएच २७ ए. व्ही. १९४५ या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात विजय कारसरटे (३०) व प्रफुल्ल उर्फ विक्की बाबाराव भलावी (२०) गंभीर जखमी झाले. त्यांना धडक दिल्यावर वाहन चालकाने तेथून भरधाव वेगाने पळ काढला. परंतु गाडी घेवून चालकाने पोबारा केला होता. याचीही माहिती आसेगाव पोलिसांना देण्यात आल्याने त्या मस्तीखोर चालकाला पकडण्यात पोलिसांना यश आले. (प्रतिनिधी)जीवाचा थरकाप उडविणारा प्रसंगअपघात करून लालपूल, जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, बसस्थानकापर्यंत बोलेरोचा चालक राजेंद्र रामचंद्र देवकर (रा. मालेगाव, जि. सोलापूर) याने भरधाव वाहन पळविले. यात अनेकांच्या अंगावर जाण्यासोबत बसस्थानकानजीक रस्ता दुभाजीकरणाला धडक दिली. उपस्थित वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला. मात्र डोळ्याची पापणी लवण्याच्या आतच तो बेपत्ता झाला. आणि मोनी निघाला भरधावलालपुलाजवळ अपघातच होताच त्याचा आवाज परिसरात पोहोचला. तेथे आपल्या कार्यालयात बसलेला ‘मोनी इर्शिद’ या कार्यकर्त्याने घटनास्थळी जखमींना उचलण्यासाठी धाव घेतली. क्षणात समयसुचकतेचा परिचय देत मोनी या युवकाने सहकाऱ्यांना जखमी युवकाकडे पाठवून स्वत:च्या दुचाकीने चारचाकी वाहनाचा पाठलाग केला. तो थेट सहा किमी अंतरावरील चांदूरबाजार नाक्यापर्यंत स्वत:चा दोन वेळा अपघात होता होता थोडक्यात बचावला. आपल्या मोबाईलमध्ये त्या भरधाव पळणाऱ्या वाहनाचे व्हीडीओ चित्रीकरण केले आणि आसेगाव पोलीस व परतवाडा पोलिसांना माहिती दिली. पिंटू भुजबळ या युवकाने जखमींना दवाखान्यात नेले. आसेगाव पोलिसांच्या वाहनाला धडकअपघात करून पळण्याच्या स्पर्धेत पांढऱ्या बोलेरोचा क्रमांक दूरध्वनीवर आसेगाव पोलिसांना देण्यात आला. पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र त्यांनाही हुलकावणी देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. अखेर पुढे बोलेरो मागे आसेगाव पोलिसांची गाडी असा खेळ पूर्णानगरपर्यंत चालला आणि पोलिसांच्या गाडीला धडक देताच बोलेरोची गती थांबली. आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.