शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

जयश्रीचा आधारवडही कोसळला, उषा कुऱ्हाडेंचा ह्यदयविकाराने मृत्यू

By admin | Updated: August 17, 2016 00:02 IST

लाडक्या लेकीचा सासरच्या मंडळीने केलेली दुर्दशा पाहून ती माऊली खचली होती.

अमरावती : लाडक्या लेकीचा सासरच्या मंडळीने केलेली दुर्दशा पाहून ती माऊली खचली होती. मुलीची प्रकृती सुधारत असल्याचे पाहून तिने कसाबसा तग धरला होता. मात्र, जयश्रीला अत्यंत गरज असताना तिच्या आईने जगाचा निरोप घेतला. आता पुन्हा एकदा जयश्री एकटी पडली आहे. सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उषा कुऱ्हाडे यांचा पारश्री रुग्णालयातच मृत्यू झाला आणि जीवनाशी झुंज देणारी जयश्री पुन्हा डगमगली आहे. कुऱ्हा येथील माहेरवासिनी जयश्री दुधे हिच्यावर माहूर येथील सासरच्या मंडळीने अन्नपाण्याविना एका अंधाऱ्या खोलीत डांबून अत्याचार केले. तिच्या अत्याचाराला 'लोकमत'ने वाचा फोडल्यानंतर अनेक हात मदतीला सरसावलेत. तिच्यावर प्रथम इर्विन रुग्णालयात उपचार झाला. त्यानंतर पारश्री रुग्णालयाचे डॉ.श्रीगोपाल राठी यांनी तिला उपचारासाठी दत्तक घेतले. जयश्रीवर योग्य उपचार सुरू झाल्याने तिची शुगर आटोक्यात येऊन तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. दरम्यान रुग्णालयात जयश्रीची काळजी घेण्यासाठी तिची आई उषा कुऱ्हाडे घेत होती. दररोज आ.यशोमती ठाकूर यांचे कार्यकर्ते जयश्री व तिच्या आईची आत्मीयतेने चौकशी करायचे. त्यामुळे दोघींनाही मोठा आधार मिळाला. मात्र, तरीसुद्धा मुलीवरील अत्याचार व तिच्या पुढील जीवनाची चिंता उषा कुऱ्हाडे यांना संतावतच होती. या काळजीमुळे तिची आई नेहमीच चिंताग्रस्त राहत होती. दरम्यान तीन दिवसांपूर्वी उषा यांचीही प्रकृती बिगडल्याने त्या कुऱ्हा गेल्या. मात्र, मुलगी रुग्णालयात एकटीच आहे, या चिंतेत ती होती. त्यामुळे तीने पुन्हा जीवाची चिंता न करीत जयश्रीची देखभाल करण्यासाठी रुग्णालयात आली. मात्र, सोमवारी सकाळी अचानक उषा कुऱ्हाडेंच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. ही बाब तेथील परिचारिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ डॉ. राठी यांना बोलावले. राठी यांनी तत्काळ उषाबाईवर उपचार सुरू केले. मात्र, काही वेळानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. आईचे निधन झाल्याचे जयश्रीला कसे सांगायचे, असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. मात्र, जयश्रीची समजूत घालत डॉक्टरने जड अंतकरणाने तिला सांगितले. आई गेल्याचे कळताच जयश्रीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा निघाल्या. काही वेळात जयश्रीच्या बहिणी माधुरी दुधे (बडनेरा), मेघा दारोकार (आर्वी) व सुनंदा पोकळे (बडनेरा) या रुग्णालयात पोहोचल्या. त्यांनीही जयश्रीचा आधार देत धीर दिला. सायंकाळी उषाबार्इंचे पार्थिव कुऱ्हा येथे नेऊन त्यांच्या पार्थिवावर अत्यसंस्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)आ. ठाकूर यांनी दिला जयश्रीला धीरजयश्रीच्या आईचे निधन झाल्याचे कळताच आ.यशोमती ठाकूर यांनी पारश्री रुग्णालय गाठले. त्यांनी डॉ.श्रीगोपाल राठी यांच्याशी चर्चा करून जयश्रीच्या वडिलांना धीर दिला. त्यानंतर जयश्रीचे भेट घेतली. तुझी काळजी आम्ही घेऊ, तू लवकर बरी हो, असे सांत्वन केले असता जयश्रीच्या डोळ्यातून अश्रू तरळले. यावेळी अनिकेत देशमुखसह पं. स. सदस्य मंगेश भगोले, प्रदीप पचलोरे, संतोष धुमाळे, अमोल बंगरे, रणजित सपाटे, प्रदीप दमाय, अमोल कुऱ्हाडे उपस्थित होते. सायंकाळी उषा कुऱ्हाडे यांच्या पार्थिवावर कार्यकर्त्यांच्या मदतीने अत्यसंस्कार करण्यात आला.