शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

जयंतीदिनीही शिक्षणमहर्षींचा ‘तो’ पुतळा उपेक्षित

By admin | Updated: December 28, 2016 01:32 IST

जिल्ह्याभरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११८ वा जयंत्युत्सव मंगळवारी साजरा झाला.

वैभव बाबरेकर  अमरावती जिल्ह्याभरातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचा ११८ वा जयंत्युत्सव मंगळवारी साजरा झाला. बहुजनांसाठी शिक्षणची कवाडे खुली करून देण्यासाठी अपरंपार कष्ट घेणाऱ्या या तत्त्ववेत्त्याला सर्व स्तरातून आदरांजली वाहिली जात असताना गाडेगनगरस्थित महापालिका शाळेतील भाऊसाहेबांचा अर्धाकृती पुतळा मात्र जयंतीदिनीही उपेक्षित राहिला. दारूच्या रिकाम्या बाटल्या, पुतळ्याच्या सभोवताल पसरलेला कचरा इतकेच नव्हे तर पुतळ्याच्या दर्शनीभागावर साचलेला मातीचा थर तात्पुरता हटवून फुलांचा एक हार या पुतळ्याच्या गळ्यात घालण्याचे सौजन्य शाळाप्रशासनाने दाखविले नाही, हे विशेष. बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्याकरिता जीवाचे रान करणाऱ्या या थोरपुरूषाच्या कार्याचा तोंडदेखला गौरव करण्याचे भानही चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या या शाळेला राहू नये, यापेक्षा अधिक दुर्देव ते कोणते?, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. २७ डिसेंबर हा डॉ. भाऊसाहेब देशमुख यांचा जन्मदिन. शिक्षणक्षेत्रातील त्यांचे कार्य वादातित आहे. त्यामुळेच जिल्हाभरातच नव्हे तर विदर्भात त्यांचा जयंत्युत्सव थाटात साजरा होतो. मात्र, गाडगेनगरातील महापालिकेची उच्च प्राथमिक मुला-मुलींची शाळा मात्र याला अपवाध ठरली. सन १९६३ साली स्थापन झालेल्या या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीचे विद्यार्थी शिक्षण घेतात. पुतळ्याजवळच रंगतात मद्यपार्ट्या महापालिकेच्या या शाळेला सरंक्षण भिंत नसल्यामुळे आवारात वराह व श्वानांचा मुक्तसंचार असतो. सरंक्षण भिंतीअभावी शाळा परिसरात कोणही ये-जा करू शकतो. पुतळ्याच्या भोवताल आढळलेल्या दारुच्या बाटल्यांवरून येथे दररोज रात्री दारूच्या पार्ट्या रंगत असाव्यात, याची खात्री पटते. मात्र, मुख्याध्यापकांसह कोणीही यागंभीर प्रकाराकडे आजवर लक्ष दिल्याचे दिसत नाही. शाळेच्या इमारतीचीही प्रचंड दुर्दशा झाली आहे.