शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

कारागृहात आता सोलर चरख्यातून खादी उद्योग

By admin | Updated: February 8, 2016 00:23 IST

कारागृह हे सुधारगृह बनविण्यासह रोजगार निर्मितीचे साधन व्हावे, यासाठी बंद्यासाठी आता सोलर चरख्यातून खादी उद्योग साकारला जाईल, ....

स्वाती साठे यांची माहिती : एलईडी दिवे बनविणे पायलट प्रकल्पाचा शुभारंभअमरावती : कारागृह हे सुधारगृह बनविण्यासह रोजगार निर्मितीचे साधन व्हावे, यासाठी बंद्यासाठी आता सोलर चरख्यातून खादी उद्योग साकारला जाईल, असे कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांनी येथे स्पष्ट केले. त्या येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या एलईडी दिवे पायलट प्रोजेक्ट उपक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होत्या.येथील मध्यवर्ती कारागृहात एलईडी दिवे तयार करण्याचा प्रकल्पाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी वर्धा येथील महात्मा गांधी इंन्स्टिट्यूट आॅफ ग्रामीण इंडस्ट्रिज (एमगिरीे) चे संचालक पी. बी. काळे, कारागृह अधीक्षक एस. व्ही. खटावकर, वरिष्ठ तुरुगांधिकारी आनंद पिल्लेवान, नितीन क्षिरसागर, कारागृहाचे शिक्षक भूषण कांबळे, प्रशिक्षक संजय बगाडे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना स्वाठी साठे म्हणाल्या, अमरावती कारागृहातील २२ बंदीजणांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वीज तंत्री म्हणून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वीज तंत्रीचा अनुभव एलईडी दिवे तयार करण्यासाठी वापरला. प्रायागिक तत्वावर १०० एईडी दिवे तयार करण्यात आले असून ते बाजार भावानुसार निम्म्या किंमतीत तयार करण्यात आले आहे. शासन निर्णयानुसार सर्वच शासकीय कार्यालयात एलईडी दिवे वापर करताना ते कारागृहातून निर्मित वापरावे, असा शासन आदेश पारीत करण्यासाठी कारागृह प्रशासन प्रयत्न करेल, असे त्या म्हणाल्या. कारागृहात खादी कापड उद्योग सुरु करणार आहोत. हे खादी उद्योग सोलर चरख्यावर सूत तयार करुन नंतर खादी कापड तयार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. सोलर चरख्यामुळे वीजेची बचत तर होईलच पण, बंदीजणांना रोजगार उपलब्ध होईल. ८ फेब्रुवारी सोमवारपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात हातमागावर साडी निर्मिती सुरु होणार आहे. सद्या बाजारात साडी मिळत नाही. मात्र आम्ही बंद्याकडून ही साडीे तयार करणार आहोत. जसा साडीचा वापर होईल तशी ती चमक ते, अशी या साडीची विशेषत: आहे. कारागृहात परंपरागत साहित्य निर्मिती ऐवजी दैनंदिन वापराच्या वस्तू, साहित्य निर्मितीवर भर दिला जाणार असल्याचे साठे यांनी सांगितले.या बंद्यांना प्रमाणपत्राचे वितरणएमगिरी या संस्थेकडून एलईडी दिवे तयार करण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्या बंदीजणांना कारागृह प्रशासनाच्या उपमहानिरिक्षक स्वाती साठे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यात सुदर्शन विघ्ने, नागेश वानखडे, गुणवंत ठाकरे, राजेश पाखरे, मोतीराम सिरसाट, रवींद्र ढोके, संदीराज कपाटे, विनोद भैसे, गोकु ल रणगिरी, शंकर उईके, सुभाष गावंडे या बंदीजनांचा समावेश होता.खुनाच्या शिक्षेतील आरोपींनी मांडल्या व्यथाकारागृह प्रशासनाच्या उपमहानिरिक्षक स्वाती साठे एलईडी दिवे तयार करण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन करुन परताना त्यांच्या पुढ्यात खुनाच्या शिक्षेतील आरोपी जसपालसिंग सैनी व हरजसंिग सैनी या बंधूंनी कारागृह स्थलांतर बाबात व्यथा मांडल्या. १० वर्षे शिक्षेची पूर्ण झाल्यानंतरही खुले कारागृहात स्थलांतर केले जात नाही, असा आरोप केला. हा प्रस्ताव वरिष्ठाकडे प्रलंबित असल्याचे सैनी बंधुनी सांगितले. दरम्यान खुनाच्या शिक्षेतील आरोपी बादलसिंग टाक याने देखील संचीत रजेबाबत व्यथा मांडल्या.