शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान जनजागृतीसाठी जयदेव राऊत यांची सायकलवर भारत भ्रमंती

By उज्वल भालेकर | Updated: March 26, 2023 18:58 IST

देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तसेच प्रत्येक घरात रक्तदाता हा संदेश पोहोचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी जयदेव राऊत हे सध्या देशभरात सायकलवर प्रवास करून जनजागृती करत आहेत. 

अमरावती : देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत, तसेच प्रत्येक घरात रक्तदाता हा संदेश पोहोचविण्यासाठी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील रहिवासी जयदेव राऊत हे सध्या देशभरात सायकलवर प्रवास करून जनजागृती करत आहेत. पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी दहा हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून ते २५ मार्च रोजी सायंकाळी अमरावतीमध्ये पोहोचले. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथील रक्तपेढीला त्यांनी भेट देत जिल्ह्यातील रक्तदान चळवळीविषयी माहिती जाणून घेतली.

रक्तदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज बनली आहे. त्याअनुषंगाने देशभरात रक्तदान जनजागृतीसाठी पश्चिम बंगाल येथील जयदेव राऊत हे १ ऑक्टोबर २०२२ पासून सायकलने देशभरात प्रवास करत आहेत. फेडरेशन ऑफ ब्लड डोनर ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाचे ते ब्रँड ॲम्बेसिडरदेखील आहेत. ते देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तेथील रक्तपेढींना भेटी देत आहेत. रक्तपेढीच्या माध्यमातून तेथील काही शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन ते रक्तदानाचे महत्त्व पटवून देत आहेत.

महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, मालेगाव, जळगाव, अकोला या जिल्ह्यांचा प्रवास करून ते अमरावतीमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी इर्विन येथील रक्तपेढीला भेट दिली. यावेळी रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. श्रीकांत झापर्डे, डॉ. संदेश यमलवाड, जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, वैज्ञानिक अधिकारी अनिल तेलमोरे, मंगेश गाढवे, परिचर गजानन इंगळे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. जयदेव राऊत हे तीन दिवस अमरावतीमध्ये मुक्काम करणार असून या दिवसांमध्ये ते विविध ठिकाणी भेटी देऊन रक्तदानाविषयी जनजागृती करणार आहेत. प्रत्येक घरात रक्तदाता निर्माण व्हावाकोणत्याही रुग्णाला रक्ताअभावी प्राण गमवावे लागू नये यासाठी नागरिकांमध्ये रक्तदान चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. देशात रक्ताची गरज लक्षात घेता, प्रत्येक घरामध्ये रक्तदाता तयार व्हावा. या उद्देशाने देशभरात सायकलने प्रवास करून रक्तदानाविषयी जनजागृती करत आहेत. दहा हजार किलाेमीटरचा प्रवास पूर्ण करून अमरावतीमध्ये पोहोचलो असून, येथील शासकीय रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदानाविषयी जनजागृती करणार असल्याचे जयदेव राऊत यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले.

  

टॅग्स :Amravatiअमरावती