शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

'जे अ‍ॅन्ड डी' मॉलधारक, महापालिकेत ‘तडजोड’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2016 00:04 IST

तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी 'जे अ‍ॅन्ड डी मॉल'च्या विकसकाला पाठविलेली ५४ लाख ५४ हजारांच्या नोटीसला आव्हान मिळल्याने...

चार लाखांची नोटीस : आयुक्त सकारात्मकअमरावती : तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी 'जे अ‍ॅन्ड डी मॉल'च्या विकसकाला पाठविलेली ५४ लाख ५४ हजारांच्या नोटीसला आव्हान मिळल्याने विद्यमान यंत्रणने या विकसकाला ४ लाखांची नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. गुडेवारांनी बोलविलेल्या नोटीस विरोधात नगरविकास विभागाकडे दाद मागितली होती. त्यावर नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यावर शासन जो काही निर्णय देईल, त्याला अधीन राहून ५४ लाखांऐवजी सुमारे ४ लाख २० रुपयांची नोटीस पाठविण्यात यावी, यावर यंत्रणेकडून शिक्कामोर्तब झाले आहे. १ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीत भाडे रक्कम आपण भरल्यास तयार आहोत, असे पत्र एस.नवीन बिल्डर्स या विकसकांनी महापालिकेत दिले. मागील आठवड्यात दिलेल्या या पत्यावर विद्यमान आयुक्तांनी नियमित भाडे रकमेचा भरणा करून घेण्याला हिरवी झेंडी दिली. राज्य शासनाने ५४ लाख ५४ हजार रुपयांची नोटीस वैध ठरविल्यास ती रक्कम भरावी लागेल. तो निर्णय बंधनकारक राहील, अशा अटी शर्तींवर 'जे अ‍ॅन्ड डी मॉल'च्या विकसकाला आर्थिक दिलासा मिळाला आहे. १ जानेवारी २०१५ ते मार्च २०१६ या कालावधीसाठी या विकसकाकडून महापालिकेला १२ लाख रुपये द्यायचे आहे. यातील ८ लाख रुपये आधीच भरणा केल्याने ५४ लाखांच्या ऐवजी एस. नवीन बिल्डर्स यांना आता केवळ ४ लाख रुपये भरायचे आहेत. (प्रतिनिधी)मनपाचे आर्थिक नुकसान विकसकाने मुदतीच आत बांधकाम पूर्ण केले नाही व करारापेक्षा अधिक जागा वापरुन गाळेधारकांना कमी क्षेत्रफळाचे गाळे देण्यात आले. तसेच वेळोवेळी नकाशामध्ये बदल केल्याने न्यालयात प्रकरण दाखल झाले. त्यामुळे भाडेपोटी मिळणारी रक्कम न मिळाल्याने मनपोच आर्थिक नुकसान झाले. या पार्श्वभूमिवर तत्कालीन आयुक्त डोंगरे यांनी भाडे रकमेत विकसकाला दिलेली सूट चंद्रकांत गुडेवार यांनी रद्द केली होती व त्यानंतर ५४.५४ लाख रुपयांची नोटिस पाठविण्यात आली होती. २१ एप्रिलचा आदेश जे अ‍ॅन्ड डी मॉल संकुलामधील दुकानाची थकीत भाड्याची रकमेचा त्वरित भरणा करण्याबाबत महापालिका आयुक्तांकडून एस.नवीन बिल्डर्सला २१ एप्रिल २०१६ ला नोटीस देण्यात आली. यात ५४ लाख ५४ हजार ५१२ रुपये पत्र मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत बाजार व परवाना विभागात जमा करावी, अशी सूचना करण्यात आली होती. गुडेवारांकडून सूट रद्दजे अ‍ॅन्ड डी मॉलच्या एस.नवीन बिल्डर्स (जेव्ही) यांना ४ जुलै २०१२ ते ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत दिलेली सूट तत्कालीन आयुक्तांनी रद्द केली होती व त्याअनुषंगाने करारनाम्यानुसार सन २०११-१२ ते मार्च २०१६ पावेतोचे कालावधीची भाडेपोटीची रक्कम ५४,५४,५१२ रुपये काढण्यात आली होती. गुडेवारांच्या या कारवाई विरोधात एस. नवीन बिल्डर्स यांनी शासनाकडे दाद मागितली आहे. १ जानेवारी १५ ते मार्च १६ या कालावधीत रक्कम भरण्यास तयार असल्याचे पत्र विकसकाकडून मिळाले. त्यानंतर शासन निकालाच्या अधीन राहून सुमारे ४ लाख रुपयांच्या भाड्यासाठी नोटिस पाठविण्यात येत आहे. - राजेंद्र दिघडे, अधीक्षक, बाजार व परवाना विभाग तत्कालीन आयुक्तांनी चुकीचे मार्किंग केले होते. त्यांच्या निर्णयावर नगर विकास विभागाने स्थगिती दिली आहे. नियमित भाडे भरल्यास तयार असल्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. - नवीन चोरिडया, विकसक, मे. एस. नवीन बिल्डर्स तत्कालीन आयुक्तांच्या नोटीसला नगरविकास राज्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. त्यामुळे त्या आधीच्या आयुक्तांचा आदेश वैध ठरतात. नगर विकास विभागाच्या निर्णयाच्या अधीन राहून थकीत रकमेच्या भरणा करण्यासाठी नोटीस पाठविली जाईल. - हेमंत पवार, आयुक्त,महापालिका