शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

‘त्या’ वेबसाईटवरचा तो तर ऑनलाईन कुंटणखानाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:01 IST

अनेक शहरांच्या विशिष्ट भागात ‘चोरी चुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून इंटरनेटवर विशिष्ट  लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यात अमरावतीच्या मुली म्हणून अनेकांची प्रोफाईल टाकली गेली आहेत.  कळस म्हणजे, त्यात संबंधित मुलींचे व्हॉट्सॲप व मोबाईल क्रमांक असल्याने या काळ्या धंद्यांची पाळेमुळे खूप खोलवर रुजल्याची प्रचिती येऊ लागली आहे. 

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ऑनलाईन जगरहाटीत अनेक व्यवसाय आज संकेतस्थळावरून हाताळली जातात.  नानाविध उत्पादने संकेतस्थळाच्या भरवशावरच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहेत. त्याला ‘कुंटणखाना’देखील अपवाद राहिलेला नाही. त्या काळ्या जगातील अनेक तस्कर, दलाल लिंक आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून देहविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. आज तर शय्यासोबत करण्यासाठी इंटरनेटवरून विविध साईड सर्च केल्यास अमरावतीमध्येही ‘ऑन कॉल’ मुली मिळू शकतात, हे भयानक वास्तव उघड झाले आहे. अनेक शहरांच्या विशिष्ट भागात ‘चोरी चुपके’ चालणाऱ्या कुंटणखाण्याऐवजी आता अनेक जणांकडून अशा कामांसाठी ‘सर्च इंजिन’चा आधार घेतला जात आहे. प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून इंटरनेटवर विशिष्ट  लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्यात अमरावतीच्या मुली म्हणून अनेकांची प्रोफाईल टाकली गेली आहेत.  कळस म्हणजे, त्यात संबंधित मुलींचे व्हॉट्सॲप व मोबाईल क्रमांक असल्याने या काळ्या धंद्यांची पाळेमुळे खूप खोलवर रुजल्याची प्रचिती येऊ लागली आहे. 

हनी ट्रॅपचा प्रकार : खंडणीची मागणी, फसवणुकीचीच शक्यता अधिक 

काय करू शकते सायबर पोलीस? अशा संकेतस्थळांची सर्व माहिती मिळविणे सायबर सेलसाठी आव्हानच आहे. सबंधित संकेतस्थळांची होस्टिंग आणि डोमेन नेम कुणाच्या नावावर नोंद केले आहे किंवा आयपी ॲड्रेसबाबत माहिती मिळविली जाऊ शकते. संबंधित वेबसाईटच्या मालकापर्यंत पोहोचणे सहज शक्य नसले तरी गुगलकडे तक्रार नोंदविल्यास संबंधित वेबसाईटवरून विशिष्ट मजकूर किंवा थेट साईडदेखील डाऊन करता येऊ शकते. सबंधित वेबसाईटची होस्टिंग परदेशात असल्यास मात्र मर्यादा येतात.

भयानकच! म्हणे, मॉडेल्सही मिळतील‘सर्च इंजिन’वर ‘फिमेल एस्कॉर्ट’ हा शब्द सर्च केला असता, त्याठिकाणी अनेक मुलींची बोल्ड छायाचित्र असलेल्या शेकडो जाहिराती दिसून येतात. या वेबसाईटवर जवळपास सर्व मोठ्या शहरांची नावे आहेत. अगदी मॉडेल्स आणि कॉलेजच्या मुली मिळतील, असा उल्लेखदेखील यात आहेत. एखाद्या पर्यटकाला किंवा अन्य कुणालाही शय्यासोबत करण्यासाठी सर्च केल्यास संबंधित वेबसाईटच समोर येते. प्रत्येक वेबसाईटच्या लिंकवर वेगवेगळ्या मुली व महिलांची माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक वेबसाईटवर वेगवेगळी माहिती आणि मोबाईल नंबर दिले आहेत. मात्र, ते फोन नंबर किती खरे न किती खोटे, हे कळू शकले नाही. 

एखाद्या मुलीची, महिलेची तक्रार आल्यास, ते प्रोफाईल डिलिट करण्यासंदर्भात संबंधित वेबसाईट वा सर्च इंजिनशी पत्रव्यवहार केला जातो. मात्र, अद्यापपर्यंत तरी अशी तक्रार सायबरकडे आलेली नाही.- सीमा दाताळकर, ठाणेदार, सायबर पोलीस ठाणे

राहा सजग, ब्लॅकमेलिंगचा धोका‘त्या’ विशिष्ट संकेतस्थळावर गेल्यास मुलींचे मोबाईल नंबर, व्हॉटसॲप क्रमांक दिसतात, त्यावर कॉल केल्यास फसवणूक होण्याची शक्यताच अधिक आहे. तो हनी ट्रॅप असू शकतो. त्यावर केलेला व्हिडिओ कॉल तुमच्यासाठी खंडणी मागणारा, तुम्हाला फसविणारा ठरु शकतो. त्यामुळे ‘ऑनकॉल’ प्रलोभनाला बळी न पडता सजग राहण्याची गरज आहे. त्यातील अनेक क्रमांक व प्रोफाईल फसवी असण्याचीच शक्यता अधिक आहे.

 

टॅग्स :honeytrapहनीट्रॅप