शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 22:53 IST

स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.

ठळक मुद्देप्रवेशासाठी झुंबड : पहिली फेरी १५ जुलैपर्यंंत, १८७ प्रवेश निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्थानिक आयटीआयमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशप्रक्रियेला ११ जुलैपासून सुरुवात झाली. प्रवेश फेरीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत १८७ प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिली प्रवेश फेरी १५ जुलैपर्यंत चालणार आहे. कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे ओढा वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची झुंबड उडाली आहे.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण २७ ट्रेड असून प्रवेश क्षमता ११५२ आहे. औद्योगिकीकरणामुळे कुशल तंत्रज्ञांची वाढती गरज लक्षात घेऊन विद्यार्थी आयटीआय प्रवेशाला प्राधान्य देत आहेत. मागील काही वर्षांत दहावी-बारावीच्या निकालाचा टक्का वाढल्यामुळे आयटीआय प्रवेशप्रक्रिया आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, गुणवत्ता क्रमानुसार प्रवेश देण्यात येत आहे. फिटर, इलेक्ट्रिशियन, टर्नर, मशिनिस्ट, मोटर मेकॅनिक आदी ट्रेडला विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. १ जून पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.पहिली गुणवत्ता यादी १० जुलैला जाहीर होताच ११ जुलैपासून प्रवेशाला प्रारंभ झाला आहे. पुढील दोन दिवस ही प्रक्रिया चालणार आहे. यानंतर उपलब्ध जागा नुसार प्रवेश फेरी होईल. अंतिम फेरी आॅगस्ट महिन्यात होणार आहे.या व्यवसाय प्रशिक्षणासाठी प्रवेशयांत्रिकी कर्षित्र, गवंडीकाम, संधाता, फाँड्रीमन, सुतारकाम, प्लास्टिक प्रोसेसिंग आॅपरेटर, यांत्रिकी डिझेल, नळ कारागीर, कम्प्यूटर आॅपरेटर अँड प्रोग्रॅमिंग, स्टेनोग्राफी अँड सेक्रेटरीअल असिस्टंट, कटिंग व सुइंग (कर्तन व शिवण) हे व्यवसाय प्रशिक्षण एक वर्षाचे आहेत. दोन वर्षे मुदतीच्या व्यवसाय अभ्यासक्रमात तारतंत्री, जोडारी, कातारी, यंत्रकारागीर, आरेखक यांत्रिकी, वीजतंत्री, यंत्रकारागीर घर्षक, पेंटर जनरल, यांत्रिक प्रशितन व वातानुकूलन, मेकॅनिक मोटर व्हिकल, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलाजी सिस्टीम मेन्टनंस, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, आरेखक वास्तुशास्त्र, इलेक्ट्रोप्लेटर, टूल अ‍ॅण्ड डायमेकर, आरेखक वास्तू व अल्पसंख्याकांसाठी एक वर्ष व्यवसाय प्रशिक्षणासाठी फाँड्रीमॅन, नळ कारागीर, कटीग अँड सुइंग, यांत्रिकी डिझेल आदी व्यवसायांच्या प्रशिक्षणासाठी सध्या प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.उच्चशिक्षणासाठी वाढते शुल्क सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना पेलवणारी नसते तसेच बेरोजगारीची समस्या ही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे औद्योगिक प्रशिक्षण घेऊन कंपनीत रोजगाराची संधी उपलब्ध होत असल्याने प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची गर्दी वाढत आहे.- सचिन धुमाळप्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थाप्रवेश फेरीचे वेळापत्रकपहिली फेरी ११ ते १५ जुलैदुसरी फेरी २१ ते २५ जुलैतिसरी फेरी ३१ जुलै ते ३ आॅगस्टचौथी फेरी ८ ते ११ आॅगस्ट